Home /News /nashik /

Accident: नाशकात एका 'कट'मुळे मोठी दुर्घटना; अपघातात 4 मित्र जागीच ठार

Accident: नाशकात एका 'कट'मुळे मोठी दुर्घटना; अपघातात 4 मित्र जागीच ठार

5 मित्र सियाज मारुती कारमधून येवल्याकडून मनमाडला येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने कट मारला. यामुळे चालकाचं कारवरुन नियंत्रण सुटलं आणि गाडी झाडावर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला.

नाशिक 11 मे : कार्यक्रमासाठी गेलेल्या चार मित्रांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे (4 Killed in Road Accident). मनमाडपासून जवळ असलेल्या पुणे-इंदौर महामार्गावर (Pune Indore Highway Accident) ही घटना घडली. 5 मित्र सियाज मारुती कारमधून येवल्याकडून मनमाडला येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने कट मारला. यामुळे चालकाचं कारवरुन नियंत्रण सुटलं आणि गाडी झाडावर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की यात कारचा चक्काचूर होऊन त्यातील 5 पैकी चार जणांचा मृत्यू झाला. तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे अशी मृतांची नावं आहेत. तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी असून त्याला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.अपघाताची माहिती मिळताच मयतांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली. भरधाव रिक्षातून दोन विद्यार्थिनींनी घेतली उडी, एकीचा जागीच मृत्यू तर दुसरी जबर जखमी या अपघातानंतर पुणे-इंदौर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि जखमीला रुग्णालयात आणण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर वाहतूक सुरळीत केली गेली. बीडमध्येही दोन अपघातात दोघं ठार दुसरीकडे बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यात तेलगाव आणि भोगलवाडी या दोन अपघातात दोघं ठार तर दोघं जखमी झाले आहेत. वडवणी तालुक्यातील बाबीतांडा येथून दोन सख्खे भाऊ आदित्य आणि अभिजित हे दुचाकीवर तेलगावला आले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात आदित्य शंकर राठोड ( वय २० वर्ष ) हा ठार झाला. अभिजित शंकर राठोड ( वय २२ वर्ष ) हा गंभीर जखमी झाला आहे. Nashik Crime: विहिरीत चार मृतदेह आढळल्याने खळबळ, तीन वेगवेगळ्या घटनांनी नाशिक हादरलं दुसरा अपघात धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथे झाला. यात महादेव साहेबराव तोंडे ( वय ३८ वर्ष ) आणि रघुनाथ वैजनाथ तोंडे ( वय ४२ वर्ष ) हे दोघे भोगलवाडी येथे दुचाकीवर लग्नासाठी जात होते. दरम्यान भोगलवाडी पाटीवर एका अज्ञात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. धडक बसताच दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. जखमींना प्रथम धारुर येथे रुग्णालयात दाखल केलं. परंतु महादेव साहेबराव तोंडे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांना अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं. परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Accident, Car crash

पुढील बातम्या