Home /News /nashik /

Nashik Crime: विहिरीत चार मृतदेह आढळल्याने खळबळ, तीन वेगवेगळ्या घटनांनी नाशिक हादरलं

Nashik Crime: विहिरीत चार मृतदेह आढळल्याने खळबळ, तीन वेगवेगळ्या घटनांनी नाशिक हादरलं

विहिरीत चार मृतदेह आढळल्याने खळबळ, तीन वेगवेगळ्या घटनांनी नाशिक हादरलं

विहिरीत चार मृतदेह आढळल्याने खळबळ, तीन वेगवेगळ्या घटनांनी नाशिक हादरलं

Nashik News: नाशिकच्या सटाणा आणि लासलगाव परिसरात तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. चार जणांचे मृतदेह विहिरीत आढळून आले आहेत.

नाशिक, 27 एप्रिल : नाशिक जिल्ह्यातून (Nashik district) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विहिरीत चार जणांचे मृतदेह (4 dead bodies) आढळून आले आहेत. नाशिक जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनेत विहिरीत चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सटाणा (Satana) आणि लासलगाव (Lasalgaon) परिसरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये विहिरीत 4 मृतदेह आढळले आहेत. एका घटनेत दिर-भावजयीचा, दुसऱ्या आणि तिसऱ्या घटनेत दोन तरुणांचा मृतदेह आढळून आला आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. या तीन घटना निफाड, लासलगाव परिसरातील देवगाव येथे घडल्या आहेत. वाचा : औरंगाबादमध्ये किराणा दुकानातून चालणाऱ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश,कोट्यवधीची रक्कम जप्त एका विहिरीत पायल पोटे आणि संदीप पोटे या दोघांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. हे दोघे नात्यात दिर-भावजयी असल्याने त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला या बाबत उलट-सुलट चर्चा होत आहेत. दुसऱ्या एका विहिरीत तरुणाचा तर सटाणा येथील ठेंगोडा येथे विहिरीत शेत मजुराचा मृतदेह आढळून आला आहे. मनमाडमध्ये बहिण संतापली अन् चाकूने वार करून भावाला संपवलं भाऊ नेहमी शिवीगाळ, मारहाण करून त्रास देत असल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून बहिणीने टोकाचे पाऊल उचलत थेट लहान भावाच्या पोटावर चाकूने वार करुन त्याचा निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना मनमाडमध्ये घडली आहे. भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विवेकानंद नगर क्र.2 या भागात दुपारी ही घटना घडली. संदीप गोंगे (वय 45) असं मयताचे नाव असून खून केल्यानंतर आरोपी बहिण शोभा गारुडकर (वय 55) स्वतः पोलीस स्थानक हजर झाली आणि मी माझ्या भावाचा खून केल्याची तीने कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिले विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विवेकानंद नगर क्र.2 मध्ये  संदीप गोंगे हा आई आणि इतर नातेवाईकांसोबत राहत होता. आई आजारी असल्यामुळे तिची सेवा करण्यासाठी श्रीरामपूर येथे राहणारी त्याची बहीण शोभा गारुडकर ही काही महिन्यापूर्वी मनमाडला आली होती. संदीप हा व्यसनी होता. तो शोभाला नेहमीच त्रास देत असे. येथे आल्यावर त्याचा त्रास वाढला होता. रोज काहीही कुरापत काढून तो तिला शिवीगाळ करून कधी कधी मारहाण देखील करायचा.

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Nashik

पुढील बातम्या