मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

heat wave : अबब! या जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक, 24 तासांत 46.5 अंश तापमानाची नोंद

heat wave : अबब! या जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक, 24 तासांत 46.5 अंश तापमानाची नोंद

विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची तिव्र लाट जाणवू लागली आहे. शनिवारी (दि.14) वर्धा जिल्ह्याचे तापमान (wardha district temperature high) सर्वाधिक नोंदववण्यात आले. वर्ध्याचे शनिवारी 46.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

  • Published by:  Sandeep Shirguppe

नागपूर, 15 मे : पुढचे चार दिवस विदर्भासह मराठवाडा (Vidarbha, Marathwada) या भागात उष्णतेची लाट (heat wave) येणार असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले होते. दरम्यान काल दिवसभरात विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट (heat wave) जाणवू लागली आहे. शनिवारी (दि.14) वर्धा जिल्ह्याचे तापमान (wardha district temperature high) सर्वाधिक नोंदववण्यात आले. वर्ध्याचे तापमान शनिवारी 46.5 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. मागील 24 तासांत तापमानात 2.5 अंशांची वाढ झाली आहे. तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक कमी 29.7 (mahabaleshwar temperature) अंश तापमानाची नोंद झाली.

विदर्भात सकाळपासून उन्हाच्या झळा (Vidarbha heat wave) जाणवू लागल्या आहेत. असानी चक्रीवादळामुळे (asani cyclone) त्या भागात हवामानात गारवा असल्याने उष्णता कमी झाली होती परंतु कालपासून पुन्हा तापमान वाढू लागले आहे. शुक्रवारी (दि. 13) 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामध्ये 24 तासांमध्ये तब्बल 2.3 अंशांनी वाढ होत शनिवारी 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवण्यास सुरूवात होते. दुपारी तर तप्त उन्हामुळे बाहेर पडणे जिकरीचे ठरत असून रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे. उष्माघाताने माणसांना त्रास जाणवू लागला आहे. यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.  

हे ही वाचा : Monsoon Updates: मान्सूनची वेळेआधी हजेरी, 48 तासांत बंगालच्या उपसागरात होणार दाखल

विदर्भातील पुढीलप्रमाणे - जिल्ह्यातील तापमान

अकोला 44.6, अमरावती 44.8, बुलडाणा 40.7, ब्रह्मपुरी 45.4, चंद्रपूर 46.2, गडचिरोली 41.4, गोंदिया 43.8, नागपूर 45.4, वर्धा 46.5, वाशिम 43.5, यवतमाळ 45

मान्सून पुढच्या 48 तासांत दाखल होणार

मान्सून (Monsoon) संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. यंदा मान्सून चार दिवस अगोदरच दाखल होणार आहे. सध्या अंदमान (Andaman) आणि निकोबार बेटांजवळ (Nicobar Islands) मान्सूनची प्रगती वेगानं होताना दिसत आहे. 26 मे रोजी केरळ (Kerala) तसंच अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

हे ही वाचाकोकण कन्या एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; या रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मात्र येत्या 48 तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच मान्सूनपूर्वी पाऊस (rain) होण्याची शक्यता वाढली आहे.

यामुळे आता महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व सरी लवकरच बरसतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शनिवारी वर्धा येथे सर्वाधिक 46.5 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली होती. तर महाबळेश्वर येथे राज्यातील निचांकी कमाल तापमान 29.7 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. विदर्भात सरासरी तापमानापेक्षा 3.5 ने कमाल तापमानात वाढ झाली आहे.

First published:

Tags: Rise in temperatures, Vidarbha, Weather, Weather forecast