मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Monsoon Updates: मान्सूनची वेळेआधी हजेरी, 48 तासांत बंगालच्या उपसागरात होणार दाखल

Monsoon Updates: मान्सूनची वेळेआधी हजेरी, 48 तासांत बंगालच्या उपसागरात होणार दाखल

Monsoon Updates: मान्सून (Monsoon) संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. यंदा मान्सून चार दिवस अगोदरच दाखल होणार आहे.

Monsoon Updates: मान्सून (Monsoon) संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. यंदा मान्सून चार दिवस अगोदरच दाखल होणार आहे.

Monsoon Updates: मान्सून (Monsoon) संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. यंदा मान्सून चार दिवस अगोदरच दाखल होणार आहे.

मुंबई, 15 मे: मान्सून (Monsoon) संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. यंदा मान्सून चार दिवस अगोदरच दाखल होणार आहे. सध्या अंदमान (Andaman) आणि निकोबार बेटांजवळ (Nicobar Islands) मान्सूनची प्रगती वेगानं होताना दिसत आहे. 26 मे रोजी केरळ (Kerala) तसंच अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र येत्या 48 तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच मान्सूनपूर्वी पाऊस (rain) होण्याची शक्यता वाढली आहे.

यामुळे आता महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व सरी लवकरच बरसतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शनिवारी वर्धा येथे सर्वाधिक 46.5 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली होती. तर महाबळेश्वर येथे राज्यातील निचांकी कमाल तापमान 29.7 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. विदर्भात सरासरी तापमानापेक्षा 3.5 ने कमाल तापमानात वाढ झाली आहे.

प्रमुख शहरांतील तापमान

वर्धा 46.5

चंद्रपूर 46.2

ब्रह्मपुरी 45.4

नागपूर 45.4

यवतमाळ 45.0

अमरावती 44.8

अकोला 44.6

वाशिम 43.5

गोंदिया 43.8

परभणी 43.4

जळगाव 41.5

गडचिरोली 41.4

औरंगाबाद 41.2

बुलडाणा 40.7

सोलापूर 40.2

उस्मानाबाद 39.0

सातारा 38.5

नाशिक 36.4

सांगली 35.4

कोल्हापूर 33.5

रत्नागिरी 33.4

मुंबई 33.6

महाबळेश्वर 29.7

First published:

Tags: Maharashtra News, Pune rain, Rain fall