रत्नागिरी, 15 मे : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात कोकण कन्या एक्सप्रेस (Konkan Kanya Express) इंजिनमध्ये बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावरील विलवडे (Vilavade Railway Station) स्थानकाजवळ घडली. दोन तासांपासून कोकणकन्या एक्सप्रेस एकाच ठिकाणी रखडली होती.
यानंतर आताच हाती आलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी-कोकण कन्या एक्सप्रेसच्या बंद पडलेल्या इंजिनला नवीन इंजिन जोडलं आहे. बंद पडलेली कोकण कन्या एक्सप्रेस निवसर स्थानकात आणली आहे. नवीन इंजिनच्या माध्यमातून कोकण कन्या एक्सप्रेस पुन्हा मार्गस्थ झाली आहे. इंजिन बंद पडल्यामुळे अनेक रेल्वेगाड्या विविध स्टेशनमध्ये अडकुन होत्या. तुतारी, मंगला एक्सप्रेस या गाड्या खोळंबल्या होत्या.
नेमके काय झालं?
आज रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने अनेक जण प्रवासात असतात. मात्र, प्रवाशात झालेल्या खोळंब्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. अशीच एक बातमी समोर आली आहे. कोकण कन्या एक्सप्रेस इंजिनमध्ये बिघाड झाला. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावरील विलवडे स्थानकाजवळ घडली. पहाटे 6 : 21 वाजताच्या सुमारास इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या खोळंबल्या गेल्या. तर दुसऱ्या रेल्वेचे इंजिन लावून ही एक्सप्रेस पुढच्या स्थानकात थांबवली.
हेही वाचा - केतकी चितळेकडून आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
कोकण कन्या एक्सप्रेस इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे मुंबई-सीएसटीहुन मडगावला जाणाऱ्या अनेक चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. दुसऱ्या रेल्वेचे इंजिन लावून पुढील स्थानकात ही एक्सप्रेस नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. थोड्याच वेळात रखडलेली कोकनकण्या एक्सप्रेस पुढील स्थानकात नेली जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे होते. यानंतर आता रत्नागिरी-कोकण कन्या एक्सप्रेसच्या बंद पडलेल्या इंजिनला नवीन इंजिन जोडलं आहे. बंद पडलेली कोकण कन्या एक्सप्रेस निवसर स्थानकात आणली. सुट्टीचा दिवस असल्याने रेल्वेत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मात्र, या घटनेमुळे अनेक चाकरमान्यांचे तसेच इतर प्रवाशांचे हाल झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Ratnagiri