नागपूर, 21 जून: नागपूरमध्ये ( Nagpur) गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरू आहे. शहरातील तहसील पोलीस स्टेशनच्या (Tehsil Police Station) हद्दीत एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या (Murder of 5 members of the same family) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच जणांची हत्या केल्यानंतर एकाने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अलोक माथुरकर असं हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अलोक माटूळकर यांने आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे.
रोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का?'
अलोक माटूळकर (Alok Matulkar) याने आपली पत्नी, मुलगी, मुलगा, सासू व मेव्हणीची हत्या केली. या हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.
Online Financial Fraud झालाय? घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल
अलोक हे टेलरिंगचे काम करायचे. प्रमोद भिसिकर यांच्या घरी भाड्याने राहायचे. कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अलोकने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
( सविस्तर बातमी लवकरच)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Murder