• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final: रोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का?'

WTC Final: रोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का?'

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात साऊथम्पटनमध्ये (Southampton) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) टेस्ट सुरु आहे. या मॅच दरम्यानचा रोहितचा (Rohit Sharma) एक फोटो सध्या व्हायरल (Viral) झाला आहे.

 • Share this:
  साऊथम्पटन, 21 जून: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात साऊथम्पटनमध्ये  (Southampton) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) टेस्ट सुरु आहे. या टेस्टचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. त्यानंतरच्या दोन दिवसांच्या खेळातही अनेक अडथळे आले. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्या दिवशी 64.4 ओव्हर्सचाच खेळ झाला. दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) जोडीवर सर्वांचे लक्ष होते. या जोडीनं टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देत ओपनिंग विकेटसाठी 62 रनची पार्टरनरशिप केली. त्याचबरोबर त्यांनी इंग्लंडच्या पिचवर एक रेकॉर्ड केला. इंग्लंडमध्ये भारतीय ओपनर्सनी तब्बल 10 वर्षांनी अर्धशतकी भागिदारी केली आहे. यापूर्वी गौतम गंभीर आणि अभिनव मुकुंद या जोडीनं 2011 साली लॉर्ड्स टेस्टमध्ये 63 रनची पार्टरनरशिप केली होती. रोहित शर्मा 34 रन काढून आऊट झाल्यानंतर ही जोडी फुटली. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर दुर्बिणीतून मॅच बघत असलेला फोटो सध्या व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून रोहितची पत्नी रितिकानं (Ritika Sajdeh) त्याला ट्रोल केले आहे. रितिकानं इन्स्टाग्रामवर (Instagram) रोहितचा फोटो शेअर करत, 'खेळ पाहत आहेस की आमच्यावर पाळत ठेवत आहेस?' असा  प्रश्न विचारला आहे. साऊथम्पटन टेस्टमध्ये टीम इंडियाची पहिली इनिंग 217 रनवर संपुष्टात आली. त्याला उत्तर देताना न्यूझीलंडनं तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस 2 आऊट 101 रन काढले आहेत. केन विल्यमसन (Kane Williamson) आणि रॉस टेलर (Ross Taylor) ही न्यूझीलंडची अनुभवी जोडी मैदानात आहे. सोमवारी, चौथ्या दिवशी या दोघांच्या खेळात पावसाचा अडथळा येण्याचा अंदाज आहे. होल्डरनं पकडला भन्नाट कॅच, विकेटचं केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा VIDEO फास्ट बॉलर काईल जेमीसन (Kyle Jamieson) आणि ओपनिंग बॅट्सन डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांच्या खेळामुळे न्यूझीलंडनं दुसऱ्या दिवसावर वर्चस्व गाजवले. जेमीसननं पाच विकेट्स घेतल्या.  तर कॉनवेनं सलग तिसऱ्या टेस्टमध्ये अर्धशतक झळकावले.
  Published by:News18 Desk
  First published: