मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आठवडाभरात घटनेची पुनरावृत्ती; वसईत समुद्रकिनारी आढळला आणखी एका तरुणीचा मृतदेह

आठवडाभरात घटनेची पुनरावृत्ती; वसईत समुद्रकिनारी आढळला आणखी एका तरुणीचा मृतदेह

Crime in Vasai: विरारमधील अर्नाळा परिसरातील नवापूर समुद्रकिनाऱ्यावर एका तरुणीचा मृतदेह (Young woman's dead body) आढळला आहे. संबंधित मुलीच्या मनगटावर जखम आढळून आली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • Published by:  News18 Desk

वसई, 04 ऑगस्ट: मागील आठवड्यात वसईतील (Vasai) भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर शिर नसलेल्या एका अज्ञात तरुणीचा मृतदेह (Young woman's dead body) आढळला होता. ही घटना ताजी असताना आता विरारमधील अर्नाळा परिसरातील नवापूर समुद्रकिनाऱ्यावर देखील एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवडाभराच्या काळात दोन घटना उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून मृत तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

मंगळवारी दुपारी विरार परिसरातील अर्नाळा येथील नवापूर समुद्रकिनाऱ्यावर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला आहे. संबंधित तरुणी 25 ते 30 वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत तरुणीच्या हाताच्या मनगटाला एक जखम आढळून आली आहे. त्यामुळे संबंधित तरुणीनं आत्महत्या केली कि तिची हत्या करून मृतदेह समुद्रात टाकला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. संबंधित तरुणीचा 18 ते 24 तासांपूर्वीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास अर्नाळा पोलीस आणि गुन्हे शाखा करत आहेत.

हेही वाचा-17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मुंबईतील TikTok स्टारवर गुन्हा

खरंतर मागील आठवड्यात सोमवारी वसईजवळील भुईगाव समुद्र किनारी एका सुटकेसमध्ये शिर नसलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला होता. संबंधित तरुणी नेमकी कोण? आणि तिची हत्या कोणी केली? याचा अद्याप उलगडा  झाली नाही. तोपर्यंत वसई परिसरात आणखी एक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही तरुणींच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्याचा आव्हान पोलिसांसमोर आहे. पण याबाबत अद्याप कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही.

हेही वाचा-इमारतीवरून नवजात बालिकेला फेकलं; विरारमधील क्रूरतेचा कळस गाठणारी घटना

विशेष म्हणजे, जुलै महिन्यात वसई परिसरातील वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्या पाच वेगवेगळे मृतदेह आढळले आहेत. यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील या मृत्यू सत्र कायम आहे. नवापूर येथील समुद्रकिनाऱ्यावर आणखी एका तरुणीचा मृतदेह आढळल्यानं या यादीत आणखी एक भर पडली आहे.

First published:

Tags: Murder, Vasai