विरार, 04 ऑगस्ट: नवजात बालिकेला (Newborn Baby Girl) एका उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीवरून खाली फेकून (Threw from building) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित सोसायटीत राहणाऱ्या अन्य काही रहिवाशांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी त्वरित बालिकेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, त्या निष्पाप चिमुकलीनं अखेरचा श्वास घेतला आहे. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विरार (Virar) पश्चिमेच्या यशवंत नगर परिसरातील ट्युलिप सोसायटीत घडली आहे. विरार पश्चिम यशवंत नगर परिसर शिक्षित आणि उच्चभ्रू वस्तीचा परिसर आहे. पण याच सोसायटीत बालिकेला इमारतीवरून फेकून दिल्याची क्रूरतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ट्युलिप इमारतीच्या आतील मोकळ्या जागेत स्थानिक रहिवाशांना एक नवजात बाळ आढळून आलं होतं. हेही वाचा- कॅब चालकाला मारहाण करणं ‘त्या’ महिलेला भोवलं; VIDEO समोर येताच पोलिसांची कारवाई हे बाळ कुणीतरी इमारतीवरून फेकल्याचं प्रथमदर्शनी दिसत होतं. तसेच बाळा अनेक ठिकाणी दुखापत झाली होती. बाळाची प्रकृती गंभीर असल्याचं लक्षात येताच, स्थानिकांनी बाळाला कपड्यात गुंडाळून त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तसेच अर्नाळा पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत, घटनेचा पंचनामा केला. हेही वाचा- 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मुंबईतील TikTok स्टारवर गुन्हा संबंधित नवजात बाळ नेमकं कोणी फेकलं आणि इमारतीच्या कितव्या मजल्यावरून फेकलं याबाबत कोणालाच काही माहीत नव्हतं. तसेच स्थानिकांनी कधीही या बाळाला ट्युलिप सोसायटीत पाहिलं नव्हतं. त्यामुळे हे बाळ नक्की कोणाचं आहे, हेही अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. संबंधित नवजात बालिकेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर, काही वेळात तिचा उपचारादरम्यानं मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







