जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध TikTok स्टारवर गुन्हा दाखल

17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध TikTok स्टारवर गुन्हा दाखल

17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध TikTok स्टारवर गुन्हा दाखल

टिकटॉक स्टार आणि त्याच्या दोन मित्रांवर एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 ऑगस्ट: दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ होत चालली आहे. अशाच एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका प्रसिद्ध tiktok स्टारवर (TIKTOK star) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका 16 वर्षीय टिकटॉक स्टार आणि त्याच्या दोन मित्रांवर एका मुलीवर लैंगिक अत्याचार (Physical abused) केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अॅपसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मुलगी आरोपीला भेटली आणि 2020 पासून मैत्री झाली. त्यात त्यांच्यात संबंध निर्माण झाले, मात्र काही काळानंतर तिला संबंध संपवायचे असल्यानं त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. हे वाचा - कॅब चालकाला मारहाण करणं ‘त्या’ महिलेला भोवलं; VIDEO समोर येताच पोलिसांची कारवाई आरोपीनं तिचे अनेक खासगी व्हिडीओ रेकॉर्ड केले, ज्याबद्दल तिला माहिती नव्हती. जर तिनं संबंध ठेवण्यास नकार दिला तर व्हिडिओ लीक करण्याची धमकी त्यानं दिली, मुलीने संपूर्ण घटना तिच्या आईला सांगितली आणि दोघांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात