मुंबई, 21 जून : महाराष्ट्रात (Maharashtra Political Update) सध्या राजकीय भूकंप सुरू आहे. कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे (eknath shinde in surat) नॉटरिचेबल झाल्यानंतर शिवसेनेत खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे 35 आमदारांसह (shivsena mla) सुरतला गेले आहेत. अशावेळी शिंदे भाजपसोबत जाणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी आघाडी सरकार (mahavikas aghadi government) पडणार असं चित्र स्पष्ट होत असताना शरद पवारांनी (Sharad pawar on Eknath Shinde) दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना रिपोर्टरकडून अनेक प्रश्न विचारण्यात आले. शिवसेनेत घडत असलेल्या हालचालीवरही सवाल केला. मात्र शरद पवांरांनी कोणासोबत काहीच बोलणं झालं नसल्याचं सांगितलं. यावेळी एका माध्यम प्रतिनिधीने त्यांना NCP ही सत्ता स्थापनेसाठी भाजपसोबत जाणार का सवाल केला. यानंतर शरद पवार जरा थांबले. आणि किमान सेन्सिबल प्रश्न विचारा असं म्हणाले. यापेक्षा मी विरोधी पक्षात राहिल अशीही त्यांनी जोड दिली. ंमात्र माध्यम प्रतिनिधीच्या या प्रश्नामुळे एकच हशा पिकला. शरद पवार म्हणाले… महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे, मागील अडीच वर्षांपासून दोन वेळा झाले आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार बनलं होतं. आमचे आमदार उचलून हरियाणा आणि गुरगावमध्ये आणून ठेवले होते. पण तिथूनही ते आमदार परत आले होते. त्यानंतर सरकार स्थापनं झालं. राष्ट्रवादीचे दोन उमेदवार होते. त्यांना पूर्णपणे पाठिंबा मिळाला. आमदार विजयी झाले आहे. आमच्या आमदारांनी योग्य भूमिका मांडली आहे. पण आम्ही अजिबात नाराज नाही. आमचा एक उमेदवार जिंकू शकला नाही. पण, इतर दुसऱ्या पक्षाचा उमेदवार होता, त्यात अपयश आले आहे. त्याला मत मिळू शकले नाही. मुंबईत जाऊन चर्चा करणार आहे. नेमकं काय घडलं आहे. राज्यातील राजकीय भुकंपाचे क्षणोक्षणीचे अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.