मुंबई, 22 जून: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Delhi meeting) यांनी नवी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. पण या बैठकीला शिवसेनेचा (Shivsena) कोणताही नेता हजर राहणार नसल्याचे वृत्त आहे. पण ही बैठक राष्ट्रमंच संघटनेची आहे, या बैठकीला इतर कोणताही पक्ष नाहीये, त्यामुळे आम्ही तिथे असणे गरजेचं नाही’ असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी शरद पवारांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीवर आपली प्रतिक्रिया दिली. ‘दिल्लीत विरोधी पक्षाची बैठक आहे, हे कुणी सांगितले आहे. या बैठकीला काँग्रेस आहे का, मायवती यांचा पक्ष आहे का, यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंच नावाने एक संघटन सुरू केलं आहे. याबद्दल ही बैठक आहे. याबद्दल मी काही सांगू शकत नाही. त्यापलीकडे या बैठकीला फार महत्त्व वाटत नाही, असं राऊत म्हणाले. SBI च्या 40 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी अलर्ट! आता ATM मधून पैसे काढणं महागणार ‘शरद पवार हे मोठे नेते आहे. राष्ट्रमंचचे लोकं पवारांकडे सल्ला घेण्यासाठी गेले असतील. त्यामुळे तिसरी आघाडी, पाचवी आघाडी असं काही वृत्त दिली जात आहे. तसं मला काही वाटत नाही. परंतु, मोदी सरकारच्या ध्येय धोरणाविरोधात एकत्र येण्यासाठी विरोधकांचा विचार सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं. पाहिले नं…मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा ‘तो’ VIDEO होतोय VIRAL ‘शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र आहे. हे ते विसरतात. पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे भाजपला सत्तेच्या बाहेर बसावं लागलं. त्यांचं दु:ख मी समजू शकतो, असा टोलाही राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.