मुंबई- ‘पाहिले नं मी तुला’ (Pahile Na Mi Tula) मालिकेतील मनू (Manu) म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले (Tanvi Mundale) पहिल्याच मालिकेत मोठी लोकप्रिय झाली आहे. गोड तन्वीने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. तन्वी ही उत्तम अभिनेत्री आहे. हे मालिकेत दिसतचं आहे मात्र तिचा आवाजसुद्धा उत्तम आहे. हे नव्याने सर्वांना कळाल आहे. तन्वीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती एक सुंदर गाणं म्हणताना दिसत आहे.
झी मराठीवरील मालिका ‘पाहिले नं मी तुला’ अगदी कमी वेळेत खुपचं लोकप्रिय झाली आहे. मनू आणि अनिचं प्रेम आणि त्यात समरच्या खुरापती प्रेक्षकांना चांगल्याच पसंत पडत आहेत. मनू आणि अनिचं लग्न मोडण्यासाठी समर वाटेल ते करायला तयार आहे. तर दुसरीकडे मनू अनिसाठी वाटेल ते करायला तयार आहे. असं मालिकेचं कथानक सुरु आहे. (हे वाचा: ‘त्याने मित्रांसमोर माझी’, घटस्फोटानंतर करिश्माने केला होता धक्कादायक खुलासा ) मालिकेमध्ये मनू जरी टेन्शनमध्ये असली, तरी रियल लाईफमध्ये खुपचं बिनधास्त जगत आहे. शुटींगमधून मिळालेल्या वेळेत मनू म्हणजेच अभिनेत्री तन्वी विविध गोष्टी करताना दिसून येते. तन्वी कधी डान्स करत असते. तर कधी समर आणि अनिसोबत मजेशीर व्हिडीओ बनवत असते. मात्र आजचं व्हिडीओ खास आहे. कारण या व्हिडीओमध्ये तन्वी आपल्या गोड गळ्यात गाणं म्हणत आहे. (हे वाचा: ‘या लोकांनी मारलं तिला’; प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडने केला धक्कादायक खुलासा ) तन्वीने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये खुपचं सुंदर गाणं म्हणताना ऐकायला मिळत आहे. हे गाणं आहे तमाशा चित्रपटातील ‘अगर तुम साथ हो’. अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोनर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं खुपचं लोकप्रिय आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. तन्वीचा हा व्हिडीओ पाहून हेचं दिसत आहे, की तन्वी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक उत्तम गायिकासुद्धा आहे. तन्वीच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.