Home /News /mumbai /

...अन् लघुशंकेसाठी गेलेला राष्ट्रवादीचा आमदार मतदानाला परतलाच नाही; महाविकास आघाडीला आणखी एक धक्का?

...अन् लघुशंकेसाठी गेलेला राष्ट्रवादीचा आमदार मतदानाला परतलाच नाही; महाविकास आघाडीला आणखी एक धक्का?

राष्ट्रवादीचे हे आमदार खेडचे दिलीप मोहिते (Dilip Mohite) हे होते. याआधी अनेकदा दिलीप मोहिते यांनी वेगवेगळ्या माध्यमातून पक्षाविषयीची आपली नाराजी व्यक्त केली आहे.

    मुंबई 04 जुलै : शिवसेनेच्या 40 आमदारांसह अपक्ष समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री तर देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर रविवारी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. यावेळी राहुल नार्वेकरांना बहुमत मिळाल्याने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला. अशात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. यात विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार लघुशंकेच्या निमित्ताने गेले आणि त्यांना मतदान करता आलं नाही. 'शरद पवार बोलतात त्याच्या उलटंच घडतं, आता हे सरकार अनेक दशकं चालणार'; प्रवीण दरेकरांचा दावा राष्ट्रवादीचे हे आमदार खेडचे दिलीप मोहिते (Dilip Mohite) हे होते. याआधी अनेकदा दिलीप मोहिते यांनी वेगवेगळ्या माध्यमातून पक्षाविषयीची आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मोहिते यांचं कालचं हे कृत्यही संशयास्पद आहे. दिलीप मोहिते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी झिरवळ यांनी पोल मागितला. गणना सुरू होण्यापूर्वी सभागृहाला पाच मिनिटं वेळ देण्यात आला होता. या वेळेत ज्या आमदारांना सभागृहात बसायचं नाही त्यांना आणि ज्यांना तटस्थ राहायचं आहे, त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. त्यावेळी आमदार दिलीप मोहितेही आपल्या पक्षाचील नेत्यांना सांगून लघुशंकेसाठी गेले. बहुमत चाचणीआधी शिवसेनेला मोठा धक्का, सेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील ठरलेल्या वेळेनंतर सभागृहाचा दरवाजा बंद झाला. यामुळे यानंतर कोणाला आतमध्ये प्रवेश मिळाला नाही. यामुळे मोहिते हे मतदानात सहभागी होता आलं नाही. विधान भवन परिसरात उपस्थित असूनही दिलीप मोहिते मतदानात सहभागी झाले नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. मात्र, याबाबत स्पष्टीकरण देताना एका माध्यमाशी बोलताना दिलीप मोहिते यांनी स्वतः सांगितलं की लघुशंकेसाठी गेलो असतानाच दार बंद झाल्याने मी सभागृहात प्रवेश करू शकलो नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, NCP

    पुढील बातम्या