मुंबई 04 जुलै : राज्यातील ठाकरे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे (Maharashtra New Government). यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडणुकीतही राहुल नार्वेकर यांना स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र, हे सरकार सहा महिनेच टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, अशी सूचना शरद पवारांनी आमदारांना दिली आहे. यानंतर चर्चांना उधाण आलं. यावर आता प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना काही युक्रेन नाही, संजय राऊतांनी शिंदे गटाला सुनावले, विधानसभा अध्यक्षांवरही टीका
दरेकर म्हणाले, की शरद पवारसाहेब जे बोलतात, त्याच्या उलटंच घडतं. ते सहा महिन्यात सरकार कोसळेल, असं म्हटले आहेत. तर हे सरकार अनेक दशकं टिकेल. शरद पवारांनी याआधीही मुंबईत येताच बंडखोर आमदार आमच्याकडे येतील, असा दावा केला होता. मात्र असं काहीही झालं नाही. हे सगळे आमदार आमच्याच बाजूने आहेत, असंही दरेकर म्हणाले.
शरद पवार यांच्या दाव्यानुसार ज्या आमदारांना मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळालं नाही तर पुन्हा ते काही दिवसांत स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेलं सरकार पुढच्या काही महिन्यांमध्ये सहज कोसळण्याची शक्यता आहे.
'ठाकरे सरकारचे माफिया पोलीस आयुक्त, हिसाब तो लेकर रहेंगे..'; किरीट सोमय्यांचं ट्विट
आज शिंदे-फडणवीस यांच्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. यावरही दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. प्रचंड बहुमताने पहिल्या अग्निपरीक्षेत आम्ही पास झालो आहोत. आजची परीक्षाही आमचं सरकार जिंकणार. पवारांचं भाकीत चुकणार, असं दरेकर यांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Pravin darekar