याला असंवेदनशीलता का नाही म्हणायचं? राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

याला असंवेदनशीलता का नाही म्हणायचं? राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

'मला काही खासगी सेवेतील डॉक्टरांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं. त्यांनी त्यांचे ह्या कोरोनाच्या काळातील जे अनुभव मला सांगितले...'

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी डॉक्टर अहोराथ प्राणाची बाजी लावून लढा देत आहे. पण, राज्य सरकारच्या एका आदेशामुळे खासगी डॉक्टरांमध्ये नाराजी पसरली आहे. याच मुद्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खरमरीत पत्र लिहिले आहे.

राज्य सरकारने कोरोना विरोधात लढा देण्यासाठी शासकीय आणि खासगी डॉक्टरांना जबाबदारी घेऊन कर्तृव्य पार पाडण्याचे आदेश दिले आहे. जर कोविडमुळे कुणाचा आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर विमा ही जाहीर केला. पण, नव्याने दिलेल्या आदेशात खासगी डॉक्टरांना वगळण्यात आल्यामुळे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

कंगनाने सोनिया गांधींचा उल्लेख करून केली विखारी टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

खासगी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेऊन ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

राज ठाकरे यांचं पत्र जसेच्या तसे..

'मला काही खासगी सेवेतील डॉक्टरांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं. त्यांनी त्यांचे ह्या कोरोनाच्या काळातील जे अनुभव मला सांगितले, जी मेहनत ते घेत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे. पण त्यांनी मला सरकारी अनास्थेची जी एक घटना सांगितली त्याने मात्र माझं मन विषण्ण झालं.

कोरोना आजाराचा संसर्ग जसा पसरू लागला तसं सरकारी आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालयं, पॅथॉलॉजी लॅब्स ह्यांना आदेश दिला की त्यांनी त्यांची सेवा अजिबात बंद ठेवू नये आणि रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज रहावं. माझ्या माहितीप्रमाणे राज्यातील बहुसंख्य खाजगी सेवेतील डॉक्टर्सनी आणि इतर खाजगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांची त्यांच्या व्यवसायाशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णांची सेवा सुरू ठेवली.

कोरोनाचा विस्फोट होताना पुणेकरांची एक चूक नडणार, धोका वाढला तरी मास्क हनुवटीवरच

ह्यातच महाराष्ट्र सरकारचं अजून एक परिपत्रक आलं की, कोरोनाच्या काळात डॉक्टर्स, इतर वैद्यकीय कर्मचारी मग ते खाजगी सेवेत असोत की सरकारी रुग्णालयांच्या सेवेत असोत ह्या सगळ्यांना विम्याचं कवच असेल आणि जर ह्यांपैकी कोणाचाही कोविडमुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ह्या विम्यातून 50 लाख रुपये दिले जातील.

पण आता खाजगी सेवेतील डॉक्टरचा कोरोना काळात सेवा देताना कोविडमुळे मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ देण्याचं सरकार नाकारत आहे आणि कारण पुढे केलं जात आहे की डॉक्टर ‘खाजगी’सेवेत होता. मुळात जर खाजगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जर ह्या विम्याचं कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल? हे चूक आहे.

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचं सर्व खासदारांना पत्र,पंतप्रधानांबद्दल म्हणाले...

माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, तुम्ही ह्या विषयांत तात्काळ लक्ष घाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खाजगी सेवेतील असो वा सरकारी सेवेतील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी असोत ह्यांच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करा. आपण ह्या विषयांत ह्या डॉक्टर्सना आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य न्याय द्याल अशी मला आशा आहे.' असं राज ठाकरे या पत्रात म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: September 14, 2020, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading