मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'मविआ'सुद्धा सेनेला संपवण्यासाठी पवारांची खेळी होती का? शिंदे गटाचा जयंत पाटलांना थेट सवाल

'मविआ'सुद्धा सेनेला संपवण्यासाठी पवारांची खेळी होती का? शिंदे गटाचा जयंत पाटलांना थेट सवालजयंत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

जयंत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

जयंत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

ठाणे, 26 जानेवारी : पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी त्याची मदत झाली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीची ही खेळी मग तेव्हा शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी होती का? असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

जयंत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बाळासाहेबांची शिवसेनेनंही जयंत पाटील यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

'पहाटेचा शपथविधी पवारांची खेळी होती तर मग ती शिवसेनेवर प्रेशर टॅकटिक होती का? अजित पवारांच्या मागे कायमचा गद्दार आणि बंडखोर बिरुदावली लावण्याकरता ती खेळी होती का? आताची जी आघाडी केली ती सुद्धा बाळासाहेबांचा विचार संपवण्यासाठी केली का? असा परखड सवाल नरेश म्हस्के यांनी विचारला.

(उद्धव ठाकरे जाणार का एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात? ठाण्यात आज हायहोल्टेज ड्रामा)

तर, जयंत पाटलांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या नेत्याच्या मनामध्ये काय होतं हे मी कसं सांगेन. प्रत्येक पक्षाने कसं काम करायचं, कोणासोबत युती करायची. एका दिवसात कसा शपथविधी करायचा कोणाला धक्का कसा द्यायचा किंवा नाही द्यायचा हे काही महाराष्ट्रामध्ये नवीन नाही. महाराष्ट्रमध्ये अनेक धक्के झालेले आहेत, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

काय म्हणाले जयंत पाटील?

23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. या पहाटेच्या शपथविधीची चर्चा अजून सुद्धा सुरू आहे. याबाबत जयंत पाटील यांनी आता खुलासा केला आहे.

'पहाटेच्या शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कोणी केली असं म्हणता येणार नाही, मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठण्यास मदत झाली. तसंच या घटनेनंतर उलट राष्ट्रवादी भक्कम झाली, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. पहाटेच्या शपथविधीची खेळी कशी झाली ? का झाली, माहित नाही असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

(पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांचा हात? जयंत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ)

तसंच, मित्र पक्ष वाढवून महाविकास आघाडीची ताकद वाढवली गेली पाहिजे. मात्र महाविकास आघाडीत असलेल्या नेत्यांनी आपली कोणतीही भूमिका असेल तर ती आताच स्पष्ट करावी, मात्र निवडणुकीच्या तोंडावर काही वेगळी भूमिका जर घेतली तर त्यांनी गोंधळ मतदारांचा होवू शकतो, असं वक्तव्य करत जयंत पाटील यांनी शिवसेनेला खडेबोल सुनावले आहेत.

First published:

Tags: Shivsena