मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उद्धव ठाकरे जाणार का एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात? ठाण्यात आज हायहोल्टेज ड्रामा

उद्धव ठाकरे जाणार का एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात? ठाण्यात आज हायहोल्टेज ड्रामा


शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच ठाण्यात येणार आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच ठाण्यात येणार आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच ठाण्यात येणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

ठाणे, 26 जानेवारी : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जाणार आहे. आनंदमठ या आनंद दिघे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. मात्र हे आनंदमठ आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य कार्यालय आहे असं असताना उद्धव ठाकरे या कार्यालयात जातील का? असा सवाल निर्माण झाला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच ठाण्यात येणार आहेत. मात्र ते येण्याआधीच ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आज दुपारी ते टेंभी नाका येथील आनंदमठ या आनंद दिघे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे भेट देणार आहेत.

('त्यांनी वडिलांसाठी काय केलं'? उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यापूर्वीच शिंदे गटाचा हल्लाबोल)

मात्र हे आनंदमठ आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य कार्यालय आहे असं असताना उद्धव ठाकरे या कार्यालयात जातील का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. हाच मुद्दा उपस्थित करुन आता शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने सामने आले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण लक्षात घेता ठाण्यात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे.

असा आहे उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा

उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनी ठाण्यातील तलाव पाळी परिसरात वैद्यकीय शिबीराला भेट देणार आहेत, यानंतर उद्धव ठाकरे आनंद आश्रमात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनाही श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे महाआरोग्य शिबिरामध्ये येतील.

(शिवसेनेतील बंडाची पूर्वीपासूनच कल्पना होती पण..; ओमराजेंचा मोठा गौप्यस्फोट)

दुपारी 12.50 मिनिटांनी ते टेंभी नाक्यावरच्या आनंदमठाला भेट देणार आहेत. दुपारी 1.15 वाजता उद्धव ठाकरे चरई जैन मंदिरात जाणार आहेत. दुपारी 1.45 ते 2.30 पर्यंतची वेळ राखून ठेवण्यात आली आहे. यानंतर दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना होतील.

याआधी नवरात्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनाला आल्या होत्या, त्यावेळीही शिवसेना ठाकरे गटाकडून ठाण्यात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

First published:

Tags: उद्धव ठाकरे