Home /News /mumbai /

मुंबईत 18 वर्षाच्या मुलानं भूक भागवण्यासाठी केवळ 120 रुपयांची केली चोरी

मुंबईत 18 वर्षाच्या मुलानं भूक भागवण्यासाठी केवळ 120 रुपयांची केली चोरी

Mumbai Crime: लोक गुन्हेगारीचा मार्ग अवलंबत आहेत. अशीच एक घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. पोलीस देखील या घटनेनं हैराण झालेत.

    मुंबई, 12 जुलै: लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशात काहीचे खाण्याचेही हाल होताहेत. या परिस्थितीमुळे लोक गुन्हेगारीचा मार्ग अवलंबत आहेत. अशीच एक घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. पोलीस देखील या घटनेनं हैराण झाले. पोलिसांनी अशा एका आरोपीला पकडलं होतं. ज्याची याआधी कधीच गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही आहे. (Mumbai Crime) एका मुलानं आपली भूक भागवण्यासाठी मुंबईच्या (Mumbai Local Train) लोकलमध्ये केवळ 120 रुपयांची चोरी केली आहे. या घटनेनं पोलीसही चक्रावले आहेत. 120 रुपये चोरण्यासाठी आरोपी चालत्या ट्रेनमध्ये चढला. त्यानं एका प्रवाशांच्या मानेवार ब्लेड ठेवला आणि त्याला धमकावत त्याच्याकडून 120 रुपये घेत पळून गेला. या घटनेनंतर पीडित प्रवासी राजू बिर्जे यांनी वसई रोड रेल्वे स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. स्टेशनवरील तैनात रेल्वे पोलिसांच्या टीमनं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजनुसार आरोपीचा तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी 18 वर्षीय अरबाज खान याला अटक केली. हेही वाचा- महिलेला कोव्हॅक्सिनऐवजी दिला कोविशल्डचा डोस, त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार काय आहे नेमकी घटना रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जुलै रोजीराजू बिर्जे रात्री सव्वा नऊच्या सुमारास नालासोपारा ते वसई रोड रेल्वे स्टेशन असा प्रवास करते होते. याच दरम्यान आरोपी अरबाज खान चालत्या लोकल ट्रेनमध्ये चढला. त्यानं राजू यांच्या गळ्यावर ब्लेड ठेवला आणि त्यांना धमकावलं. आरोपीनं राजू यांच्याकडील 120 रुपये घेतले. त्यानंतर जशी ट्रेन वसई रोड रेल्वे स्टेशनवर पोहोचली. आरोपी अरबाज पळून गेला. यानंतर राजू बिर्जेनं वसई रोड रेल्वे स्टेशनवर उपस्थित असलेल्या पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 392 अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू केला. हेही वाचा- पूल कोसळल्यानं अलिबाग-मुरुड वाहतूक विस्कळीत, भाजप आक्रमक या चौकशीत पोलिसांनी नालासोपारा आणि वसई रोड CCTV फुटेज तपासले. त्यानंतर खबरीनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला पकडलं. पीडित राजू बिर्जे यांनी आरोपीला समोर उभे केले असता ओळखलं. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीचा कोणताही गुन्हेगारीचा रेकॉर्ड नाही आहे. केवळ भूक भागवण्यासाठी चोरी केली असं आरोपीनी पोलिसांना सांगितलं. हे ऐकताच पोलिसांनाही धक्का बसला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime news, Mumbai local, Mumbai News, Vasai

    पुढील बातम्या