Home /News /maharashtra /

काशीदमध्ये जूना पूल कोसळला; वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

काशीदमध्ये जूना पूल कोसळला; वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

Kashid Bridge Collapsed: अलिबाग-मुरुड (Alibag Murud) मार्गावरील काशीद (Kashid) येथील जूना पूल कोसळल्याची (Bridge Collapsed) घटना काल घडली.

    रायगड, 12 जुलै: अलिबाग-मुरुड (Alibag Murud) मार्गावरील काशीद (Kashid) येथील जूना पूल कोसळल्याची (Bridge Collapsed) घटना काल घडली. हा पूल कोसळल्यानं एक कार आणि मोटार सायकल अशी दोन वाहनं अडकली. वाहनांमधळी 6 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र यात एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुरुडकडे जाणारा वाहतूक पर्यायी मार्ग रोहा सुपेगाव मार्गे वाहने वळवण्यात आली आहेत. भाजपनं आता दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रविवारी पासून संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस (Heavy rain) सुरु होता. त्यात मुरुड तालुक्यातही पावसाची संततधार सुरु होती. अशातच 50 वर्षांचा जीर्ण झालेला हा पूल अतिवृष्टीमुळे कोसळला असल्याचे सांगण्यात येतं आहे. अलिबाग-मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवर असलेला हा जुना पूल होता. हेही वाचा- पालकांसाठी महत्त्वाची बातमी, शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया दरम्यान पुलाचे काम 3 दिवसाआधी PWD च्या खात्याने सुरू केलं होतं. मात्र रहदारी बंद न केल्यानं हा दुर्दैवी अपघात झाल्याचा आरोप भाजपनं केला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक कुटुंब गाडीसह अडकून पडलं होतं. प्रशासनाचा ढिसाळ कारभार याला जबाबदार असून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. यात एक चार चाकी वाहन आणि एक मोटारसायकलसह पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला. यात एक बाईक चालक पाण्यात वाहून गेला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती एकदरा येथील आहे. विजय चव्हाण असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. मुरूडचे नायब तहसिलदार रविंद्र सानप यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Raigad, Rain

    पुढील बातम्या