मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आता सामना मुंबईच्या मैदानात.. उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा; लवकरच तारीख जाहीर करणार

आता सामना मुंबईच्या मैदानात.. उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा; लवकरच तारीख जाहीर करणार

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 23 जानेवारी : "मुंबई तुम्हाला सोन्याच अंड देणारी कोंबडी वाटते, तुम्हाला मुंबईला लुटायची आहे, ही कोंबडी कापायची आहे, यांना मुंबई कंगाल करायची आहे", असा घणाघात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांवर केला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठाकरे गटाची आगामी भूमिका कशी असेल यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदित्य ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आजही मला तेच चैतन्य तोच जोश आणि तिच गर्दी दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुखांचा आज वाढदिवस. गद्दार खोक्यांनी विकले जाऊ शकतात, विकत घेतले जाऊ शकतात, पण ही उर्जा विकत घेता येणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष मिंधे गटात किंवा भाजपात गेले ही बातमी आली तर आश्चर्य वाटायला नको. आज प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत आले. आज वारशाचे आणि विचारांचे नातु एकत्र आले. बिजिंगमध्ये 2 दिवसात सरकार विरोधात बोलणारा माणूस दिसेनासा होतो. तसा प्रकार इथे सुरू झाला आहे. बाळासाहेबांच्या कलाकृतीला साकारणाऱ्या कलाकृतीचा आनंद घाई गडबडीत घेतला आहे. चित्र रेखाटले पण त्या कलाकारांना पुरेसा वेळ दिला का हे विचारा. बाप चोरता चोरता स्वतः चे बाप विसरू नका. एकीकडे शरद पवारांचा फोन वरून सल्ला घेतला म्हणता दुसरीकडे मोदींचा माणुस म्हणायचं नेमकं काय हवंय?

वाचा - शिवसेना-वंचित युतीने महाविकासआघाडीत अडचणी? काँग्रेसने ठाकरेंसमोर ठेवली अट!

मुंबईत जाहीर सभा घेणार, आता आमने-सामने मैदानात : उद्धव ठाकरे

तुमच्यामुळे मी पक्ष प्रमुख आहे ज्यादिवशी तुम्ही सांगाल तेव्हा मी या पदावरून खाली उतरेल. मोदींनी आम्ही सुरू केलेल्या कामाची लोकार्पण केली. तीन वर्षांपासून ही काम सुरू आहेत. पैसे बँकेत एफडी करून विकास होत नाही हे सांगतात पण तोट्यात असलेल्या पालिकेच्या 2003 नंतर जनतेच्या पैशातून ठेवी निर्माण झाल्या. मुंबईला तुम्हाला सोन्याचं अंड देणारी कोंबडी वाटते, तुम्हाला मुंबईला लुटायची आहे, ही कोंबडी कापायची आहे, यांना मुंबई कंगाल करायची आहे. राज्यपालांना फार उशीरा अक्कल सुचली महाराष्ट्राची अपमान करणारा माणूस आहे. मी लवकरच मुंबईत जाहीर सभा घेणार आहे, आता आमने-सामने मैदानात होईल, अशी घोषणा देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

First published:

Tags: BMC, Mumbai, Uddhav tahckeray