Home /News /mumbai /

'ठाकरे आणि शिवसेना हे नाव सोडून जगून दाखवा'; मुख्यमंत्र्यांचं बंडखोरांना आव्हान

'ठाकरे आणि शिवसेना हे नाव सोडून जगून दाखवा'; मुख्यमंत्र्यांचं बंडखोरांना आव्हान

उद्धव ठाकरे म्हणाले, कोण कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी त्यादिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करणार आहे.

    मुंबई 24 जून : राज्यात राजकीय संकट ओढावलं आहे. शिवसेनेचे अनेक आमदार बंड करून एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गुवाहाटी येथे गेल्याने महाविकास आघाडी सरकार सध्या संकटात आहे. अशात आता उद्धव ठाकरेंनी (Udhhav Thackeray) बंडखोरांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, कोविडचं विचित्र लचांड गेल्या दोन वर्षांपासून मागे लागलं आहे. कोविडचं लफडं संपतं न संपतं तर मानेचा त्रास सुरू झाला आणि आता हा त्रास. राज्यात ज्या मुख्यमंत्रीपदावरुन एवढं महाभारत सुरुय, त्यांची ताकद, पात्रता, पगार माहितीय का? उद्धव ठाकरे म्हणाले, कोण कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी त्यादिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करणार आहे. मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडली नाही. स्वप्नातसुद्धा मी विचार केला नव्हता की मी या पदावर जाईन, त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, ऑपरेशन करणं गरजेचं होतं. आपल्याशी आपुलकीने बोलतो. दिवाळीत मला उभं राहता येत नव्हतं डळमळीत वाटत होतं. मला वाटलं मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलत आहे, मात्र मग लक्षात आलं की माणेचं दुखणं आहे. डॉक्टर म्हणाले 15 दिवसात ऑपरेशन करावं लागेल आणि मी केलं. एकनाथ शिंदे नेमके गेले कुठे? एका तासापासून हॉटेलमधून गायब ठाकरे म्हणाले, माझ्या मानेत ताण आला होता. खांद्यापासून पायापर्यंत हालचाल बंद झाली होती. काहींना वाटलं हा बरा होत नाही. काही लोक अभिषेक करत होते, तर काही देव पाण्यात बुडवून होते आणि म्हणते होते की हा बरा झाला नाही पाहिजे. माझी बोटंसुद्धा उघडत नव्हती. मला त्याची परवा नाही, मला आई जगदंबाने ताकद दिली जबाबदारी दिली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Uddhav thackeray

    पुढील बातम्या