Home /News /mumbai /

'शस्त्रं कधी, कुणासाठी काढायची असतात हे उद्धव ठाकरेंच्या संध्याकाळच्या भाषणातून कळेल' संजय राऊतांचा सूचक इशारा

'शस्त्रं कधी, कुणासाठी काढायची असतात हे उद्धव ठाकरेंच्या संध्याकाळच्या भाषणातून कळेल' संजय राऊतांचा सूचक इशारा

'शस्त्रं कधी, कुणासाठी काढायची असतात हे उद्धव ठाकरेंच्या संध्याकाळच्या भाषणातून कळेल' संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

'शस्त्रं कधी, कुणासाठी काढायची असतात हे उद्धव ठाकरेंच्या संध्याकाळच्या भाषणातून कळेल' संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

Sanjay Raut on Shiv Sena Dussehra Melava: शिवसेनेचा दसरा मेळावा आज होत आहे. या मेळाव्यापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर : शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dussehra Melava) आज होत आहे. या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय भाषण करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. त्याच दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले, दसरा मेळावा आज आहे... संध्याकाळी जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख भाषणाला उभे राहतात तेव्हा तुम्हाला कळेल की विजयादशमीनिमित्त शमीच्या झाडावरची शस्त्रे काढली जातात ती कुणासाठी आहेत, कशासाठी काढली जातात. नक्कीच आजचं त्यांचं भाषण महत्त्वाचं आहे. देशात आणि महाराष्ट्रात मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख काय भूमिका मांडतात याकडे देशभराचं लक्ष आहे. षण्मुखानंद सभागृहात सर्व नियमांचे पालन करुन आजचा मेळावा होईल. या मेळाव्यातून नक्कीच महाराष्ट्राला, देशाला, राजकारणाला एक दिशा देण्याचा प्रयत्न होईल. सरसंघचालकांची चिंता योग्य आहे संजय राऊत म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा रॅलीत देशासमोर काही भूमिका मांडली, परंपरेने भाषण करत असतात आणि त्याला एक वेगळं महत्त्व असतं. नारकोटिक्स आणि ड्रग्जचा पैसा जर देशाच्या विरोधात जर कोणी उपयोग करत असेल तर सरकार काय करत आहे? सरकार कुणाची आहे? जेव्हा नोटबंदी झाली होती तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं, नोटबंदीने ड्रग्ज मार्फत माफियांना मिळणारा पैसा बंद होईल. ही लिंक तुटेल. पण हे जर झालेलं नाहीये तर सरसंघचालकांची चिंता योग्य आहे आणि आम्हीही त्याच्याशी सहमत आहोत. वाचा : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेला डिवचलं, 'गर्व से कहो हम हिंदू है' शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी कुठेतरी काहीतरी चुकलंय आणि अपयश आलंय पंतप्रधानांनी देशाला वचन दिलं होतं की, नोटबंदीचा निर्णय घेतला आहे याचं कारण म्हणजे दहशतवाद्यांना जो पैसा मिळतो तो एकतर बनावट नोटांच्या व्यवहारातून आणि दुसरं म्हणजे अंमली पदार्थांच्या व्यवहारातून मिळतो. नोटबंदीमुळे अशा व्यवहारांचं आणि कृत्याचं कंबरडं मोडलं जाईल असं आश्वासन आणि वचन दिलं होतं. पण आज चार वर्षांनी सरसंघचालक त्याच विषयावर चिंता व्यक्त करत असतील, कुठेतरी काहीतरी चुकलंय आणि अपयश आलंय हे सरसंघचालकांच्या भाषणातून स्पष्ट होत आहे असंही संजय राऊत म्हणाले. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका सामनाच्या अग्रलेखात म्हटलं, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची अवस्था होते तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे. सध्या या मंडळींची जी बेताल वक्तव्ये चालली आहेत त्या बातम्या वाचून आणि ऐकून लोकांची तर खूप करमणूक होत असते. पुन्हा 'धाड' प्रयोगही सुरूच आहेत. महाराष्ट्र हा सोन्यासारखा प्रदेश आहे. हे राज्य कायम तेजस्वी सूर्यासारखे तळपत राहिले. त्याच तेजाची माणसे येथे जन्मास आली. त्यामुळे विचारांचे सोने महाराष्ट्रात सदैव उधळत राहिला. दोन वर्षांपासून महाराष्ट्रात 'ठाकरे' सरकार काम करत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरून सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्रे आता काढावीच लागतील असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Sanjay raut, Shiv sena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या