Home /News /mumbai /

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेला डिवचलं, 'गर्व से कहो हम हिंदू है' शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेला डिवचलं, 'गर्व से कहो हम हिंदू है' शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेला डिवचलं, 'गर्व से कहो हम हिंदू है' शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेला डिवचलं, 'गर्व से कहो हम हिंदू है' शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी

MNS posters infront of Shiv Sena Bhavan Mumbai: दसऱ्याच्या दिवशी मनसेकडून शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

मुंबई, 15 ऑक्टोबर : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) शिवसेना भवनासमोर (Shiv Sena Bhavan) पोस्टर्स लावून शिवसेनेला डिवचल्याचं दिसून येत आहे. मनसेकडून दसऱ्याच्या (Dussehra) शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर 'गर्व से कहो, हम हिंदू है' म्हटलेलं असून त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा फोटोही पहायला मिळत आहे. सेनाभवना समोर हे पोस्टर लावून एकीकडे मनसे हिंदूत्वाचा (Hundutva) नारा बुलंद करत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने हिंदूत्वापासून फारकत घेतली आहे असे दाखवण्याता प्रयत्न या पोस्टर मधून होत आहे. शिवसेनाचा आज दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी मनसेने असे पोस्टर्स लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिवसेनेवर सातत्याने हिंदूत्वापासून फारकत घेतल्याची टीका होत आहे. तर दुसरीकडे आगामी ननपा निवडणुकांत मनसे आणि भाजपची युती होणार असल्याची चर्चा रंगत आहे. त्यातच आता मनसेकडून हिंदूत्वाचा नारा देणारे पोस्टर्स मुंबईत झळकले आहेत. आज शिवसेनचा दसरा मेळावा होत आहे. शिवसैनिकांसह राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांचं लक्ष लागलंय ते, शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात काय बोलणार याकडे. पुढील वर्षी फेब्रवारी महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनिती काय असणार ? शिवसेना पक्ष आणखी बळकट करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर गेले वर्षभर विरोधकांनी सातत्याने शिवसेनेवर आक्रमकपणे टीका करत अनेक आरोप केलेत. यासर्वांचा खास ठाकरी शैलित उद्धव ठाकरे समाचार घेणार आहेत. माटुंगा येथील शण्मुखानंद सभागृहात आज संध्याकाळी 6 वाजता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास सुरवात होतेय. कोविड 19 संसर्ग प्रतिबंधात्माक नियमांचं पालन करत 50 % सभागृहातील आसनांवर शिवसैनिक आणि पदाधिकारी बसतील. त्यामुळे फक्तं मुंबई आणि ठाणे शहरातील प्रमुख शिवसैनिकांना आणि पदाधिकारी यांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे. शिवसेनेचे सामनातून भाजपवर टीकेचे बाण सामनाच्या अग्रलेखात म्हटलं, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची अवस्था होते तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे. सध्या या मंडळींची जी बेताल वक्तव्ये चालली आहेत त्या बातम्या वाचून आणि ऐकून लोकांची तर खूप करमणूक होत असते. पुन्हा 'धाड' प्रयोगही सुरूच आहेत. महाराष्ट्र हा सोन्यासारखा प्रदेश आहे. हे राज्य कायम तेजस्वी सूर्यासारखे तळपत राहिले. त्याच तेजाची माणसे येथे जन्मास आली. त्यामुळे विचारांचे सोने महाराष्ट्रात सदैव उधळत राहिला. दोन वर्षांपासून महाराष्ट्रात 'ठाकरे' सरकार काम करत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरून सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्रे आता काढावीच लागतील असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Hindu, MNS, Shiv sena

पुढील बातम्या