मुंबई, 27 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावणाऱ्या दोन पोलिसांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. आता आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
मुंबई पोलीस मुख्यालयात काम करणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत बॅंकिंग विभागात काम करणारे हे दोन अधिकारी आहेत. राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणाची हे दोघे चौकशी करत होते. या निमित्ताने राज्य सहकारी बॅंकेचे अनेक अधिकारी कर्मचारी तसंच काही खाजगी व्यक्तींची या दोन अधिकाऱ्यांनी भेट घेतली होती.
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान या अधिकाऱ्यांनी एका महिलेची चौकशी केली होती. या महिलेला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यात तिचा मृत्यू झाला. अशी माहिती या दोन अधिकाऱ्यांना कळताच दोन्ही अधिकारी आणि त्यांच्या सोबत असलेल्या ८ पोलिसांची तात्काळ कोरोनाची चाचणी केली.
हेही वाचा - आधीच लॉकडाऊन त्यात भाचीने घातला गोंधळ, काकाने गोळ्या घालून केलं ठार
कोरोनाची चाचणी केल्यानंतर हाती आलेल्या रिपोर्टमुळे पोलिसांना एकच धक्का बसला. यात दोन पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर उपचार सुरू आहे.
या पोलिसांच्या संपर्कात आलेल्या इतर पोलिसांना ठाणे तसंच मुंबईतील विलगीकरण वॉर्ड मध्ये ठेवण्यात आलं आहे. तर काहींना होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले आहे.
कोरोनामुळे दोन पोलिसांचा मृत्यू
कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाबसमोर आली असून नवी मुंबईत एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 2 पोलिसांचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - पुण्यातील कोरोनाचं मूळ नष्ट करण्यासाठी मोठं पाऊल, हॉटस्पॉटसाठी नवी मोहिम
नवी मुंबईत पोलीस हवालदाराला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. 23 एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर नवी मुंबईतील MGM रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी पहाटे 04. 40 च्या सुमारास उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर 25 एप्रिल रोजी मुंबईत कोरोनामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. मुंबईत पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना होती. मृत पोलीस कॉन्स्टेबल 57 वर्षांचा असून वाकोला पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.