Home /News /news /

आधीच लॉकडाऊन त्यात भाचीने घातला गोंधळ, काकाने गोळ्या घालून केलं ठार

आधीच लॉकडाऊन त्यात भाचीने घातला गोंधळ, काकाने गोळ्या घालून केलं ठार

आरोपी व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, तो बर्‍याच दिवसांपासून अस्वस्थ होता आणि खूप वेळा त्याने नकार दिल्यानंतरही मुलगी आवाज करत होती.

    इस्लामाबाद, 27 एप्रिल : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात एका 48 वर्षीय व्यक्तीनं स्वतःच्या 7 वर्षाच्या भाच्याला गोळ्या घालून ठार केलं. ती खूप गोंधळ घालत होती म्हणून काकाने तिला गोळी घातल्याचं सांगण्यात येत आहे. पेशावरच्या तहकल भागात रविवारी दुपारी एका व्यक्तीने रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. आरोपी व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, तो बर्‍याच दिवसांपासून अस्वस्थ होता आणि खूप वेळा त्याने नकार दिल्यानंतरही मुलगी आवाज करत होती. डॉनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हत्या झालेल्या मुलीच्या वडिलांनी त्याच्याच भावाविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान कळलं की, शादाब जावेद नावाचा काका एकटाच राहत होता आणि त्याचं लग्नही झालं नव्हतं. साम टीव्हीच्या मते, लॉकडाऊनमुळे शादाब खूप अस्वस्थ असल्याचं शेजाऱ्यांना पोलिसांना सांगितलं. आरोपीच्या भावाचं कुटुंब दुसर्‍या मजल्यावर राहत होतं आणि शादाब पहिल्या मजल्यावर राहत होता. रविवारी परिसरातील मुलं रस्त्यावर खेळत होती, त्यादरम्यान त्यानं अचानक त्यांच्या घराच्या बाल्कनीतून गोळ्या झाडण्यास सुरवात केली. 'गोंधळ करत होती मुलं' सुरुवातीच्या चौकशीत शादाबने पोलिसांना सांगितलं की, त्याचा हेतू कोणाला ठार मारण्याचा नव्हता, त्याला फक्त मुलांना घाबरवायचं होतं. पण यातील एक गोळी त्याच्याच भाचीला लागली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास केला असता दोन्ही भावांमध्ये वाद असल्याची माहितीही समोर आली. त्यामुळे हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा पोलीस शोध घेत आहेत.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या