मुंबई, 01 जुलै : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार, 2 किमीपर्यंत वाहतुकीला परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनःश्च हरि ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमी पर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे’ असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
‘राज्य सरकारने काय ते एकदा ठरवावे, अर्थचक्र फिरवायचे का दोन किमीमध्येच फिरायचे, तातडीने निर्णय घ्या जनतेचा संभ्रम दूर करा’ अशी मागणीही पाटील यांनी केली. महाराष्ट्र कोरोनामुक्त करं, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं दरम्यान, महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी आज घातले. ‘या’ मोठ्या बँकेत बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका, वाचा सविस्तर मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले. मुंबई हादरली, शुल्लक भांडणातून 4 वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. संपादन - सचिन साळवे