मुंबई हादरली, शुल्लक भांडणातून महिलेनं 4 वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून केली हत्या

मुंबई हादरली, शुल्लक भांडणातून महिलेनं 4 वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून केली हत्या

अंधेरीच्या सहार परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं एका 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली. या घटनेनं सर्वांना हादरून सोडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 01 जुलै : एकीकडे संपूर्ण देश कोरोना सारख्या अदृश्य संकटाशी दोन हात करत असताना दुसरीकडे गुन्हेगारीच्या प्रकारांमध्येही वाढ होत आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात असाच एक धक्कादायक प्रकार घडला. अंधेरीच्या सहार परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं एका 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली. या घटनेनं सर्वांना हादरून सोडलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचा मृत मुलाच्या आई-वडिलांशी वाद होता. हा वाद इतका टोकाला गेला की, महिलेनं बदला घेण्यासाठी 4 वर्षांच्या चिमुरड्याची हत्या केली. मधू गाधे असे आरोपी महिलेचे नाव असून, तिनं 4 वर्षांच्या चिमुरड्याला सोमवारी रात्री घरी बोलवलं. त्यानंतर आरोपी महिलेनं कपड्यानं चिमुरड्याचा गळा आवळला, एवढेच नाही तर तिने तिच्या बाथरुममध्येच पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीत त्याचं डोकं बुडवलं, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

वाचा-घरात वृद्ध आईसमोर लेकाचा 3 तास पडून होता मृतदेह, कुणीचं आलं नाही पुढे अखेर...

दरम्यान, जेव्हा मुलाच्या आईनं मुलाचा शोध घेतला तेव्हा सर्व शेजार्‍यांच्या घरांची तपासणी केली. मात्र आरोपी मधू गाधेनं मुलाच्या आईला घरात घेतले नाही. त्यानंतर जबरदस्ती मुलाची आई गाधे यांच्या घरात घुसली तेव्हा तिच्या बाथरूममध्ये मुलाचा मृतदेह सापडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वाचा-बहिणीच्या बलात्काराचा भावानं घेतला बदला, जेलमध्येच 6 वर्ष केलं प्लॅनिंग आणि...

मुलाच्या आई-वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर कलम 302 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा-'सुशांतवरील #MeToo चा आरोप केवळ अफवा', या अभिनेत्रीचे पोलिसांकडे स्पष्टीकरण

संपादन-प्रियांका गावडे.

First published: July 1, 2020, 12:51 PM IST

ताज्या बातम्या