जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 'या' मोठ्या बँकेत बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका, वाचा सविस्तर

'या' मोठ्या बँकेत बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका, वाचा सविस्तर

'या' मोठ्या बँकेत बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका, वाचा सविस्तर

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या (Punjab National Bank) ग्राहकांना मोठा झटका मिळाला आहे. आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून बँकेच्या कोट्यवधी खातेधारकांना बचत खात्यावर मिळणारे व्याज कमी झाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 जुलै : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या (Punjab National Bank) ग्राहकांना मोठा झटका मिळाला आहे. आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून बँकेच्या कोट्यवधी खातेधारकांना बचत खात्यावर मिळणारे व्याज कमी झाले (Reduced Interest on Saving Account) आहे. पीएनबीने (PNB) त्यांचे बचत खात्यावरील व्याजदर घटवले आहेत. बँकेने रेपो रेटशी लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये 0.40 टक्क्यांची कपात केली आहे. यानंतर RLLR 6.65 टक्के करण्यात आला आहे. याआधी RLLR 7.06 टक्के इतका होता. त्याचप्रमाणे 1 जुलैपासून बँकेतील बचत खात्यावर जास्तीत जास्त 3.25 टक्के वार्षिक व्याज मिळेल. पीएनबीच्या बचत खात्यामध्ये 50 लाख रुपये रक्कम असणाऱ्या ग्राहकांना वार्षिक 3 टक्के तर 50 लाखापेक्षा जास्त रक्कम असणाऱ्या ग्राहकांना वार्षिक 3.25 टक्के व्याज मिळेल. याआधी देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआय (SBI) आणि कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) देखील व्याजदरामध्ये कपात केली होती. (हे वाचा- ATMमधून पैसे काढणे आणि बचत खात्यात रक्कम ठेवण्याबाबत आजपासून बदलणार हे नियम )

जाहिरात

पंजाब नॅशनल बँक एफडीवर देते एवढे व्याज -1 ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.10 टक्के -2 ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.10 टक्के (हे वाचा- आजपासून बदलणार हे 10 महत्त्वाचे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम ) -3 ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.30 टक्के -5 वर्षांच्या एफडीसाठी 5.40 टक्के -5 ते 10 वर्षांच्या एफडीसाठी 5.40 टक्के संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pnb , pnb bank
  • First Published :
जाहिरात
जाहिरात