Home /News /mumbai /

आमदार निवासातील शहाजी बापू पाटील यांच्या खोलीतील छताचा भाग कोसळला; बेडवर मातीचा ढीग

आमदार निवासातील शहाजी बापू पाटील यांच्या खोलीतील छताचा भाग कोसळला; बेडवर मातीचा ढीग

या घटनेचा फोटोही व्हायरल झाले आहेत.

    मुंबई, 7 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर (CM Eknath Shinde) सध्या आणखी एका व्यक्तीची चर्चा आहे, ती म्हणजे शहाजी बापू पाटील यांची. एक डायलॉगमुळे ते प्रसिद्ध झाले. दरम्यान, शहाजी बापू पाटील सध्या राहत असलेल्या आकाशवाणी आमदार निवासमधील छताचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात शहाजी बापू यांना काही दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शहाजी बापू पाटील आकाशवाणी आमदार निवासमध्ये राहतात. येथे पाटील यांच्या खोलीच्या छताचा भाग कोसळला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. रुममधील बेडवर सीलिंगचा मोठा भाग कोसळल्याचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. जर आमदार त्यावेळी खोलीत असते तर अनर्थ घडला असता. काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल या आपल्या डायलॉगमुळे शहाजी बापू पाटील भलतेच व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या डायलॉगवर गाणीही निघाली आहेत. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर ते आमदारांसोबत गुवाहाटी येथे राहत होते. येथे राहत असताना बापू पाटलांनी शिवसैनिकाला तेथील निसर्गाचं कौतुक सांगताना हे विधान केलं होतं. आपल्या अस्सल ग्रामीण शैलीतील त्यांचं फोनवरील संभाषणही व्हायरल झालं होतं. दरम्यान, सांगली येथे वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये पीक अप जीप घुसून झालेल्या अपघातात (Warkari Accident) जखमी झालेल्या वारकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वतः व्हिडीओ कॉलद्वारे (Video Call) संवाद साधून चौकशी केली. यावेळी तुम्हाला लागेल ती सर्व वैद्यकीय मदत शासनाच्या वतीने करण्यात येईल असे सांगून त्यांनी सगळ्यांना आशवस्त केले. खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यानी मिरज जिल्हा रुग्णालयात जाऊन या जखमी वारकऱ्यांची चौकशी केली. या दुर्घटनेत एकूण 19 वारकरी जखमी झाले होते त्यापैकी 3 जणांना घरी सोडण्यात आले आहे, तर उरलेल्या 14 लोकांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Mumbai, Shivsena

    पुढील बातम्या