Home /News /mumbai /

आमच्याशी बोलायचे असेल तर भाजपही सोबत, केसरकरांनी 'मातोश्री' थेट कळवलं

आमच्याशी बोलायचे असेल तर भाजपही सोबत, केसरकरांनी 'मातोश्री' थेट कळवलं

'उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला बोलावले तर आम्हालाही आनंद होईल. पण आता आम्ही एकटे नाही'

'उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला बोलावले तर आम्हालाही आनंद होईल. पण आता आम्ही एकटे नाही'

'उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला बोलावले तर आम्हालाही आनंद होईल. पण आता आम्ही एकटे नाही'

    मुंबई, ०७ जुलै :'उद्धव ठाकरे साहेबांनी (uddhav thackery) आम्हाला बोलावले तर आम्हालाही आनंद होईल. पण आता आम्ही एकटे नाही. आम्ही आता भाजप बरोबर आहोत त्यामुळे त्यांच्याशीही संवाद साधावा लागेल. आम्ही संवाद साधत असताना आम्हाला थेट साहेबांशी बोलायचे आहे. मधले आजुबाजूचे लोक बाहेर ठेवून संवाद साधावा ही अपेक्षा आहे'असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी शिवसेनेसोबत चर्चेची अपेक्षाच बोलून दाखवली आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. सर्व बंडखोर आमदार आपआपल्या मतदारसंघात पोहोचले आहे. पण आता शिंदे गट मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न करत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिेंदे यांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्विकारला. यावेळी त्यांच्यासोबत दीपक केसरकर सुद्धा होते. पत्रकारांशी बोलत असताना दीपक केसरकर यांनी आपली भूमिका मांडली. 'ते खूप जवळचे समजतात स्वत:ला पण ते खूप जवळचे असतील शरद पवार यांच्या आहे. आम्ही पहिल्या दिवसांपासून साहेबांचे मन वळविण्याचे प्रयत्न करत होतो. राऊत यांच्या पायावर लोटांगण घालणाऱ्यातला मी नाही. साहेबांनी सुद्धा सांगावे मी कधी मंत्रिपदासाठी मी त्यांना म्हटलं आहे, असं म्हणत केसरकर यांनी राऊत यांच्यावर टीका केली. (सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होणार) 'मी कधी उत्तर देत नाही. पण तुम्ही एका महिला खासदाराला पदावरून काढता. हा सर्व महिलांचा अपमान आहे. तुम्ही त्यांना पदावरून काढता मग त्यांच्यीशी बोलता. याला अर्थ राहात नाही, असं म्हणत केसरकर यांनी खासदार भावना गवळी यांना लोकसभा गटनेतेपदावरून काढल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 'ज्या क्षणी शपथ घेतली त्यांच दिवसापासून त्यांनी कामाला सुरूवात केली आहे. पण भारतीय परंपरा प्रमाणे त्यांनी पुजा करून त्यांनी आज त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दालनात भेटण्याचा आनंद जसा आम्हाला झाला तसाच आनंद महाराष्ट्रातील लोकांना होईल असा विश्वास आहे. त्यांच्या दालनामध्ये आनंद दिघे यांचा फोटो आहे. हा गुरुचा शिष्याने केलेला सन्मान आहे असे माझे मानने आहे. आजवर सगळ्या विभुतींचे फोटो लागले आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचे ते गुरू आहेत. आज शिष्य मुख्यमंत्री झाला म्हणून त्याने आपल्या गुरुचा फोटो लावला आहे, असा खुलासा केसरकर यांनी केला.
    (शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका, 13,340 कोटींचा 'तो' निधी रोखला) लोकांनी रिक्षावाला म्हणून हिणवले पण त्या रिक्षावाल्याच्या व्यथा ही ते समजू शकतात. त्यांच्यासाठी एसटी स्टँडवर एक चेंबर करण्याचा विचार ते करत आहे. काही अधिकाऱ्यांनी आमचे अभिनंदन केले कारण आम्ही जनतेच्या हितासाठी लढा दिला आहे आता महाराष्ट्राचा विकास वेगात होईल अशी त्यांची भावना आहे. आजचा दिवस राजकारणाच्या पलीकडे जाऊन आनंद व्यक्त करण्याचा आहे, असंही केसरकर म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या