Home /News /maharashtra /

रस्ते अपघातात वारकरी जखमी, मुख्यमंत्र्यांकडून आधी मोफत उपचार, मग Video Call

रस्ते अपघातात वारकरी जखमी, मुख्यमंत्र्यांकडून आधी मोफत उपचार, मग Video Call

सांगली येथे वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये पीक अप जीप घुसून झालेल्या अपघातात (Warkari Accident) जखमी झालेल्या वारकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वतः व्हिडीओ कॉलद्वारे (Video Call) संवाद साधून चौकशी केली.

    मुंबई, 7 जुलै : सांगली येथे वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये पीक अप जीप घुसून झालेल्या अपघातात (Warkari Accident) जखमी झालेल्या वारकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वतः व्हिडीओ कॉलद्वारे (Video Call) संवाद साधून चौकशी केली. यावेळी तुम्हाला लागेल ती सर्व वैद्यकीय मदत शासनाच्या वतीने करण्यात येईल असे सांगून त्यांनी सगळ्यांना आशवस्त केले. खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यानी मिरज जिल्हा रुग्णालयात जाऊन या जखमी वारकऱ्यांची चौकशी केली. या दुर्घटनेत एकूण 19 वारकरी जखमी झाले होते त्यापैकी 3 जणांना घरी सोडण्यात आले आहे, तर उरलेल्या 14 लोकांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी काल तातडीने या घटनेची दखल घेऊन मिरज येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलून या वारकऱ्यांवर लागेल ते उपचार तत्काळ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज पुन्हा या वारकऱ्यांची फोनवरून चौकशी करून त्याना लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ बुधवारी एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली आहे. या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे. त्याबाबतही सर्व यंत्रणाना निर्देश द्या. त्या वाहनांना स्टिकर्स देण्यात यावेत. गणेशोत्सवात ज्याप्रमाणे आपण व्यवस्था करतो, त्याप्रमाणे या वाहनांची नोंद करून या वाहनांना टोल माफ करण्यात यावी. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करा, असे निर्देश मुख्यमंंत्र्यांनी दिले आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde

    पुढील बातम्या