मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mansukh Hiren death प्रकरणाचा तपास NIA कडे द्या, ठाणे कोर्टाच्या ATS ला आदेश

Mansukh Hiren death प्रकरणाचा तपास NIA कडे द्या, ठाणे कोर्टाच्या ATS ला आदेश

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा NIA कडे द्यावा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली होती.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा NIA कडे द्यावा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली होती.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा NIA कडे द्यावा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली होती.

मुंबई, 24 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (Mansukh Hiren death Case) महाराष्ट्र सरकारला धक्का बसला आहे. महाराष्ट्र एटीएसकडे (Maharashtra ATS) असलेला तपास हा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए NIA कडे देण्याचे आदेश ठाणे सत्र सत्र न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही NIA करणार आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा NIA कडे द्यावा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली होती. पण, एटीएसने तपास सुरू असल्यामुळे तो एनआयएकडे सुपूर्द केला नव्हता. त्यामुळे एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणी सुनावणी झाली.  दुपारी 3.40 मिनिटांनी आदेशाची प्रतीवर ठाणे सत्र न्यायलयाने तपास एनआयएकडे द्यावा, यावर शिक्कामोर्तब केलं.

डासना मंदिराच्या पुजाऱ्याचं खळबळजनक विधान, कलामांना म्हटल 'जिहादी'

मनसुख प्रकरणी संपूर्ण तपास एटीएसने एनआयएकडे सोपवावा असा आदेश देण्यात आला आहे.  सर्व कागदपत्रे एनआयएकडे हस्तांतरित करण्याचे आदेश   ठाणे सत्र न्यायालयने दिले आहे.  ठाणे सत्र न्यायालयाचा हा निर्णय एटीएसला मोठा झटका समजला जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात Double Mutant Variant; काय आहे हा प्रकार?

परंतु, राज्य सरकारने ठाणे सत्र न्यायालयाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे वाद?

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास 6 मार्चपासून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक करत आहे. पण 20 मार्चपासून हा तपास एनआयएला सुपूर्द करावा असे आदेश केंद्रीय गृह विभागाने जारी केले होते. त्यानंतर या सोमवारी म्हणजेच 22 मार्च रोजी एनआयए आणि राज्याच्या गृह खात्याकडे तसंच राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास सुपूर्द करण्याबाबत कायदेशीर व्यवहार केले. मात्र, दोन्हीकडून एनआयएला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात तपासाबद्दल मागणी केली होती.

First published:

Tags: Crime news, Hiren mansukh, Maharashtra, Mumbai, Mumbai ATS, Nia, Sachin vaze