मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /अरे देवा! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात Double Mutant Variant; काय आहे हा नवा प्रकार?

अरे देवा! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात Double Mutant Variant; काय आहे हा नवा प्रकार?

देशात कोरोनाच्या डबल म्युटेशन व्हॅरिएंटने (Double Mutation Variant) आता चिंता वाढवली आहे.

देशात कोरोनाच्या डबल म्युटेशन व्हॅरिएंटने (Double Mutation Variant) आता चिंता वाढवली आहे.

देशात कोरोनाच्या डबल म्युटेशन व्हॅरिएंटने (Double Mutation Variant) आता चिंता वाढवली आहे.

  नवी दिल्ली, 24 मार्च : देशभरात आणि त्यातही महाराष्ट्रात सध्या कोरोनाची (Corona) रुग्ण संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढीला लागली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नव्याने निर्बंध लागू केले जात आहेत. कोरोनाची वेगवेगळी रूपं भारतात आढळत आहेत. त्यात आता  या पार्श्वभूमीवर डबल म्युटेशन व्हॅरिएंट (Double Mutation Variant) हा कोरोना विषाणूचा नवा प्रकार महाराष्ट्रात (Corona New Variant in Maharashtra) सापडला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

  इंडियन सार्स-सीओव्ही-टू कन्सॉर्शियम ऑनजीनॉमिक्सकडून (इन्साकोग -INSACOG) जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) अर्थात कोरोना विषाणूची जनुकीय संरचना उलगडण्याचं काम सुरू आहे.  यादरम्यान महाराष्ट्रासह 16 राज्यांत डबल म्युटेशन व्हॅरिएंट (Double Mutation Variant) आढळला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली.

  पण महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आली आहे. तिच्याशी कोरोनाच्या या नव्या प्रकाराचा काही संबंध असल्याचं स्पष्ट होण्याइतक्या मोठ्या प्रमाणात हा प्रकार आढळलेला नाही,असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

  डबल म्युटेंट वेरिएंट म्हणजे काय?

  डबल म्युटेंट वेरिएंट म्हणजे एकाच व्यक्तीला कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या वेरिएंटची लागण होणं. सोप्या भाषेत म्हणायचं तर याला कोरोनाचं डबल इन्फेक्शन म्हणू शकता. जगातील पहिलं असं प्रकरण ब्राझीलमध्ये आढळलं होतं. ब्राझीलमध्ये दोन रुग्णांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कोरोनाची लागण झाली होती.

  हे वाचा - मुंबईसह या राज्यांमध्येही होळी, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी; जाणून घ्या नियम

  भारतात महाराष्ट्रासह 18 राज्यात डबल म्युटेंट वेरिएंट आढळला आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण 771 कोरोना वेरिएंट्सची माहिती मिळाली आहे. यामध्ये यूके (बी .1.1.7) व्हायरसचे 736, दक्षिण आफ्रिकन (B.1.351) व्हायरसचे 34 आणि ब्राझील (P.1) वेरिएंटचा एक नमुना पॉझिटिव्ह आहे.

  म्युटेशन म्हणजे काय?

  म्युटेशन (Mutation) ही अशी क्रिया आहे, ज्यात संबंधित विषाणू त्याच्याविरोधात केल्या जाणाऱ्या उपायांना दाद न देण्याच्या दृष्टीने स्वतःमध्ये काही जनुकीय बदल घडवून आणत असतो. म्युटेशन होण्यापूर्वीच्या विषाणूसाठी तयार केलेल्या लशीचा किंवा औषधाचा परिणाम म्युटेशन झालेल्या विषाणूवर होईलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे अशी म्युटेशन्स शोधण्याचं काम सुरू असतं. म्युटेशन्स काही वेळा जास्त धोकादायक असू शकतात, तर काही म्युटेशन्स फारशी धोकादायक नसू शकतात. लस विकसित करून ती लस देण्याचं काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे साहजिकच कोरोनाकडूनही स्वतःच्या बचावासाठी म्युटेशन्स सुरू आहेत.

  हे वाचा - तरुणांना कोरोना लस का दिली जात नाही? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

  'इन्साकोग'ने दिलेल्या माहितीनुसार, केरळमधल्या 2032नमुन्यांपैकी 11जिल्ह्यांतल्या 123नमुन्यांमध्ये कोरोनाचा N440K हा व्हॅरिएंट आढळला. त्या प्रकारा विरोधात रुग्णांच्या प्रतिकारशक्तीने काम केलं नाही, असं आढळलं. तेलंगणा,आंध्र प्रदेशसह ब्रिटन, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातही या प्रकाराची लागण झालेले रुग्ण आढळले होते.

  First published:

  Tags: Corona, Coronavirus, Covid-19, Health, India, Lifestyle, Wellness