ठाणे, 5 मे: जनसामान्यांचे जनजीवन पूर्वपदावर यावे याकरता राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उघडण्यासाठी नव्या उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात अनलॉक 1 (Unlock 1) लागू केला आहे. मात्र, त्याच्याही नियमावलीचा ठाणेकरांनी फज्जा उडवला आहे. हेही वाचा.. Unlock 1.0 : तब्बल अडीच महिन्यांनंतर पुणेकरांसाठी खुली झाली ही ठिकाणं, पण.. काही आवश्यक नियमांनुसार हे अनलॉक वन राज्यात लागू झाला आहे. मात्र, नियम पाळतील ते ठाणेकर कसले. कोरोनाचा प्रादुर्भाव नाही यासाठी घराबाहेर पडल्यानंतर तोंडावर मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचा वापर करावा. याचबरोबर दुचाकीवरुन एका पेक्षा जास्त व्यक्तीनं प्रवास करु नये, नागरिकांच्या सुरक्षेसाठी असा नियम असला तरी ठाण्यात मात्र नागरिक दुचाकीवर डबल सीट फिरताना सर्रास दिसत आहेत. म्हणून ठाणे पोलिसांनी अशा ठाणेकरांना नियम दाखवत थेट दुचाकी जप्तीची कारवाई केली आहे. ठाण्याच्या जांभळी नाका, बाजार पेठ चौकात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे नाराज ठाणेकर पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने बदललेली नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमावलीत मुंबई मेट्रोपोलिटन रिझनमध्ये (MMR) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर या मुंबई मेट्रोपोलिटन रिझनमधील महापालिका क्षेत्रातील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवास करता येणार आहे. याशिवाय आऊटडोर फिजिकल अॅक्टिव्हिटी म्हणजे घराबाहेर व्यायाम करायला गेलात तर तुम्हाला ओपन जिममधील कोणतीही उपकरणं वापरता येणार नाहीत. हेही वाचा.. PHOTOS: अडीच महिन्यांनंतर सुरू झालं पुणे, बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स उघडली रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने एकाचदिवशी उघडण्यास परवानगी नाही. ऑड आणि इव्हन या नियमाप्रमाणे रस्त्याच्या एका बाजूची आणि दुसऱ्या बाजूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.