शिवाय महिलांचे खरेदीचे आवडते ठिकाण तुळशीबाग मार्केट आणि तरुणाईमध्ये लोकप्रिय शॉपिंग स्पॉट हॉंगकॉंग लेन हेही सुरू होतं आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
मास्क,सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टंसिंगबाबतचे सम विषम नियम पाळून या बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत.
शहरातील प्रमुख बागाही सकाळी 6 ते 8 तसंच संध्याकाळी 5 ते 7 वाजता फिरण्यासाठी आणि व्यायामाकरता सुरू झाल्या. मात्र, तिथं लहान मुलं, जेष्ठ नागरिक यांना परवानगी दिलेली नाही.
- 10 वर्षे वयोगटातील लहान मुले, गरोदर महिला, 65 वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्तींना बागेत प्रवेशबंदी