• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • IT Raid: "संघर्ष करणं ही पवारांची खासियत... कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पुढे झुकणार नाही" - सुप्रिया सुळे कडाडल्या 

IT Raid: "संघर्ष करणं ही पवारांची खासियत... कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पुढे झुकणार नाही" - सुप्रिया सुळे कडाडल्या 

"संघर्ष करणं ही पवारांची खासियत... महाराष्ट्रचा सह्याद्री दिल्ली पुढे झुकणार नाही" : सुप्रिया सुळे कडाडल्या

"संघर्ष करणं ही पवारांची खासियत... महाराष्ट्रचा सह्याद्री दिल्ली पुढे झुकणार नाही" : सुप्रिया सुळे कडाडल्या

Supriya Sule reaction on Income Tax raid: आयकर विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:
ठाणे, 8 ऑक्टोबर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांसोबतच बहिणींच्या घरावर आणि त्यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल धाड (Income tax raid) टाकली. पुण्यातील बहिणीच्या घरी आयकर विभागाकडून अद्यापही चौकशी सुरू आहे. यासोबतच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याही मुंबईतील कार्यालयात आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संघर्ष करणं पवारांची खासियत आहे असं ही यावेळी सुप्रिया सुळेंनी म्हटलं. नवरात्रौत्सवासाठी देवीच्या दर्शनासाठी ठाण्यात (Thane) सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, नवरात्र म्हणजे माझी आई आहे. महाविकास आघाडीने मंदिरे उघडली.. त्यांचे आभार.. सरकारने जे नियम आखून दिलेला आहेत त्या नियमाचे पालन करावे. दिल्लीपुढे झुकणार नाही - सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांनी आयकर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देत म्हटलं, नुसते दादांचे नातेवाईक नाहीत आमचे देखील नातेवाईक आहेत. आमची जॉइंट फॅमिली आहे, संघर्ष करणे ही पवारांचे खासियत आहे. दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्ली पुढे झुकणार नाही आणि झुकला ही नाही. सुढाचे राजकारण आम्ही कधीही केले नाही आणि कधीही करणार नाही. अजित पवार म्हणाले, "पाहुणे आलेत, ते गेल्यावर..." आयकर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईवर अजित पवार म्हणाले, "पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत त्यांचं काम चालू आहे ते गेल्यावर मला काय बोलायचं आहे ते मी बोलेन. ते गेल्यावर मला काय भूमिका मांडायची आहे ती मांडेल. नियमाने जे असेल ते जनतेच्या समोर येईन त्यात घाबरायचं काय कारण". जवाहरालाल छाजेड, मुकेश बग्रेचा, राजेंद्र घाडगे, सचिन शिनगारे, विरधवल जगदाळे यांच्याकडे काल साखर कारखान्याच्या संदर्भाने धाडी पडल्या होत्या. सचिन शिनगारे, विरधवल जगदाळे, राजेंद्र घाडगे, जरंडेश्वर, दौंड शुगर, जरंडेश्वर,आणि अंबालिका येथे आलटून पालटून डायरेक्टर होते. काल काय म्हणाले होते अजित पवार? अजित पवार यांनी गुरुवारी प्रतिक्रिया देत म्हटलं, आयकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे. जर आयकर विभागाला काही शंका असतील तर ते छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असणाऱ्या काही कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. दरवर्षी आम्ही टॅक्स भरणारे आहोत. मी राज्याचा अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठला कर कसा चुकवायचा नाही, व्यवस्थितपणे टॅक्स कसा भरायचा हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे माझ्या सर्व कंपन्या, माझ्याशी संबंधित कंपन्यांचे टॅक्स वेळोवेळी भरले जातात. त्यात कुठलीही अडचण नाही. वाचा: साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर Income Tax विभागाची धाड, अजित पवारांच्या अडचणीत वाढ? आयकर विभागाची धाड राजकीय हेतूने ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने रेड टाकली की त्यांना आणखी काही माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सचे अधिकारीच सांगू शकतील. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर मला काही बोलायचं नाहीये. कारण मी सुद्धा एक नागरिक आहे असंही अजित पवारांनी म्हटलं. इन्कम टॅक्स टाकण्यामागचं कारण समजू शकलं नाही अजित पवार पुढे म्हणाले, मला एका गोष्टीचं दु:ख आहे. माझ्या बहिणी ज्यांची 35-40 वर्षांपूर्वी लग्न झालं. त्या त्यांच्या-त्यांच्य़ा घरी अतिशय चांगल्या पद्धतीने संसार करत आहेत. त्यापैकी कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सने धाड टाकल्या आहेत. याच्या पाठीमागचं कारण मला समजू शकलेलं नाहीये.
Published by:Sunil Desale
First published: