मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली पण बहिणींच्या कंपन्यांवर छापेमारी का? Ajit Pawar यांचा सवाल

माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली पण बहिणींच्या कंपन्यांवर छापेमारी का? Ajit Pawar यांचा सवाल

'गृहमंत्रिपदामुळे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख अडचणीत सापडले आहे, त्यानंतर अचानक बदल करण्यात आले आणि गृहमंत्रिपद हे दिलीप वळसे पाटलांकडे देण्यात आले'

'गृहमंत्रिपदामुळे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख अडचणीत सापडले आहे, त्यानंतर अचानक बदल करण्यात आले आणि गृहमंत्रिपद हे दिलीप वळसे पाटलांकडे देण्यात आले'

Ajit Pawar reaction on IT raid: अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

मुंबई, 7 ऑक्टोबर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय असलेले आयकर विभागाच्या (Income Tax) रडारवर आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळीच अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्यांच्या साखर कारखान्यांवर छापेमारी केली. यासोबत अजित पवारांंच्या पुण्यातील दोन बहिणी आणि कोल्हापूर येथील बहिणीच्या कार्यालयावर छापेमारी (Income Tax raid on Ajit Pawar sisters companies) केल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर आयकरची छापेमारी सुरू आहे. आयकरच्या चार अधिकाऱ्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर देखील आयकरचे अधिकारी पोहचले आहेत. या कारवाईनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे.

अजित पवार म्हणाले, आयकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे. जर आयकर विभागाला काही शंका असतील तर ते छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असणाऱ्या काही कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. दरवर्षी आम्ही टॅक्स भरणारे आहोत. मी राज्याचा अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठला कर कसा चुकवायचा नाही, व्यवस्थितपणे टॅक्स कसा भरायचा हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे माझ्या सर्व कंपन्या, माझ्याशी संबंधित कंपन्यांचे टॅक्स वेळोवेळी भरले जातात. त्यात कुठलीही अडचण नाही.

वाचा:  साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर Income Tax विभागाची धाड, अजित पवारांच्या अडचणीत वाढ?

आयकर विभागाची धाड राजकीय हेतूने

ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने रेड टाकली की त्यांना आणखी काही माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सचे अधिकारीच सांगू शकतील. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर मला काही बोलायचं नाहीये. कारण मी सुद्धा एक नागरिक आहे असंही अजित पवारांनी म्हटलं.

इन्कम टॅक्स टाकण्यामागचं कारण समजू शकलं नाही

अजित पवार पुढे म्हणाले, मला एका गोष्टीचं दु:ख आहे. माझ्या बहिणी ज्यांची 35-40 वर्षांपूर्वी लग्न झालं. त्या त्यांच्या-त्यांच्य़ा घरी अतिशय चांगल्या पद्धतीने संसार करत आहेत. त्यापैकी कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सने धाड टाकल्या आहेत. याच्या पाठीमागचं कारण मला समजू शकलेलं नाहीये.

वाचा: Mission Kavach Kundal: 'मिशन कवच कुंडल'ची आरोग्यमंत्र्यांकडून घोषणा, जाणून घ्या काय आहे ही योजना

अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर धाड टाकली असेल तर राज्याच्या जनतेने याचा जरुनर विचार केला पाहिजे की कुठल्या स्ततरावर जाऊन आज या वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जातोय. मी पुन्हा सांगतो की, इतर ठिकाणी छापेमारी केली त्याबाबत मला काही बोलायचं नाहीये. पण ज्यांचा काही संबंधित नाही अशांच्या घरावर छापेमारी त्याचं मला निश्चितच वाईट वाटतं. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कुणी राजकारण करुु शकतं हे मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. सरकार येत असतात सरकार जात असतात शेवटी जनता सर्वस्व आहे. गेल्या काळातही निवडणुकीदरम्यान पवार साहेबांचा बँकेशी संबंध नसतानाही त्यांना ईडीची नोटीस देण्यात आली.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Income tax