• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • बहिणीच्या घरी दुसऱ्या दिवशीही इन्कम टॅक्सची चौकशी सुरू, अजित पवार म्हणाले, "पाहुणे आलेत, ते गेल्यावर..."

बहिणीच्या घरी दुसऱ्या दिवशीही इन्कम टॅक्सची चौकशी सुरू, अजित पवार म्हणाले, "पाहुणे आलेत, ते गेल्यावर..."

बहिणीच्या घरी 27 तासांपासून आयकर विभागाची चौकशी सुरू, अजित पवार म्हणाले "पाहुणे आलेत, ते गेल्यावर बोलेन..."  (अजित पवार फाईल फोटो)

बहिणीच्या घरी 27 तासांपासून आयकर विभागाची चौकशी सुरू, अजित पवार म्हणाले "पाहुणे आलेत, ते गेल्यावर बोलेन..." (अजित पवार फाईल फोटो)

Ajit Pawar reaction on Income tax raid: आयकर विभागाकडून अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापेमारी सुरू आहे. यावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:
पुणे, 8 ऑक्टोबर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने काल (7 ऑक्टोबर 2021) छापेमारी (Income Tax Raid) केली. यासोबतच अजित पवार यांच्या बहिणींच्या घर, कार्यालयांवरही आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. अजित पवारांच्या बहीण रजनी इंदुलकर (Rajani Indulkar) यांच्या घरी सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाचे अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि झाडाझडती सुरू आहे. जवळपास 27 तासांपासून ही कारवाई सुरू आहे. या कारवाईवर अजित पवारांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "पाहुणे आलेत, ते गेल्यावर बोलेन..." आयकर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईवर अजित पवार म्हणाले, "पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत त्यांचं काम चालू आहे ते गेल्यावर मला काय बोलायचं आहे ते मी बोलेन. ते गेल्यावर मला काय भूमिका मांडायची आहे ती मांडेल. नियमाने जे असेल ते जनतेच्या समोर येईन त्यात घाबरायचं काय कारण". जवाहरालाल छाजेड, मुकेश बग्रेचा, राजेंद्र घाडगे, सचिन शिनगारे, विरधवल जगदाळे यांच्याकडे काल साखर कारखान्याच्या संदर्भाने धाडी पडल्या होत्या. सचिन शिनगारे, विरधवल जगदाळे,  राजेंद्र घाडगे, जरंडेश्वर, दौंड शुगर, जरंडेश्वर,आणि अंबालिका येथे आलटून पालटून डायरेक्टर होते. काल काय म्हणाले होते अजित पवार? अजित पवार यांनी गुरुवारी प्रतिक्रिया देत म्हटलं, आयकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे. जर आयकर विभागाला काही शंका असतील तर ते छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असणाऱ्या काही कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. दरवर्षी आम्ही टॅक्स भरणारे आहोत. मी राज्याचा अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठला कर कसा चुकवायचा नाही, व्यवस्थितपणे टॅक्स कसा भरायचा हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे माझ्या सर्व कंपन्या, माझ्याशी संबंधित कंपन्यांचे टॅक्स वेळोवेळी भरले जातात. त्यात कुठलीही अडचण नाही. आयकर विभागाची धाड राजकीय हेतूने ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने रेड टाकली की त्यांना आणखी काही माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सचे अधिकारीच सांगू शकतील. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर मला काही बोलायचं नाहीये. कारण मी सुद्धा एक नागरिक आहे असंही अजित पवारांनी म्हटलं. वाचा:  साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर Income Tax विभागाची धाड, अजित पवारांच्या अडचणीत वाढ? इन्कम टॅक्स टाकण्यामागचं कारण समजू शकलं नाही अजित पवार पुढे म्हणाले, मला एका गोष्टीचं दु:ख आहे. माझ्या बहिणी ज्यांची 35-40 वर्षांपूर्वी लग्न झालं. त्या त्यांच्या-त्यांच्य़ा घरी अतिशय चांगल्या पद्धतीने संसार करत आहेत. त्यापैकी कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सने धाड टाकल्या आहेत. याच्या पाठीमागचं कारण मला समजू शकलेलं नाहीये. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर धाड टाकली असेल तर राज्याच्या जनतेने याचा जरुनर विचार केला पाहिजे की कुठल्या स्ततरावर जाऊन आज या वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जातोय. मी पुन्हा सांगतो की, इतर ठिकाणी छापेमारी केली त्याबाबत मला काही बोलायचं नाहीये. पण ज्यांचा काही संबंधित नाही अशांच्या घरावर छापेमारी त्याचं मला निश्चितच वाईट वाटतं. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कुणी राजकारण करुु शकतं हे मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. सरकार येत असतात सरकार जात असतात शेवटी जनता सर्वस्व आहे. गेल्या काळातही निवडणुकीदरम्यान पवार साहेबांचा बँकेशी संबंध नसतानाही त्यांना ईडीची नोटीस देण्यात आली.
Published by:Sunil Desale
First published: