Coronavirus: कोरोनाचा देशात कहर, गेल्या 24 तासांत 97 हजार लोकांना कोरोनाची लागण

Coronavirus: कोरोनाचा देशात कहर, गेल्या 24 तासांत 97 हजार लोकांना कोरोनाची लागण

देशातील निरोगी रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा चार पट जास्त आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : देशात कोरोनामुळे हाहाकार सुरू आहे. आजही कोरोनाचे धक्कादायक आकडे समोर आले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 96424 नवीन प्रकरणं समोर आली असून गेल्या 24 तासांत 1174 लोकांचा मृत्यू झाला असून 87,778 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. कोरोनाच्या या रोजच्या वाढत्या रुग्णांमुळे देशात कोरोनाचा आकडा 52 लाखांच्या पुढे गेला आहे.

देशात एकूण 52 लाख 14 हजार 678 कोरोना रुग्ण आहेत. तर 41 लाख 12 हजार 552 कोरोनाच्या संसर्गापासून बरे झाले आहेत तर कोरोनामुळे आतापर्यंत 84,372 लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 1006615 कोरोना नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत देशभरात 6,15,72,343 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

मनसेनं केला ठाण्यात हुक्का पार्लरचा पर्दाफाश, कोरोना काळात तरुण-तरुणींचा धिंगाणा

देशातील निरोगी रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा चार पट जास्त आहे. सध्या देशात 10 लाख 17 हजार 754 सक्रिय प्रकरणे आहेत. कोरोना इतका गंभीर संसर्ग आहे की फक्त सहा देशांत जगातील 60 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, भारत, ब्रिटन, इटली या देशांचा समावेश आहे. तर अमेरिका, ब्राझील, मेक्सिको आणि भारतामध्ये 70 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी

या चार देशांमध्ये एकूण 4.30 लाख लोक कोरोनामुळे मरण पावले आहेत. ही संख्या जगातील एकूण मृत्यूंपैकी 52 टक्के आहे. भारत हा जगातील संक्रमित रुग्णांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे. इतकंच नाही तर मृत्यूच्या जास्त घटनांमध्ये भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका असलेला भारत हा दुसरा देश आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 18, 2020, 10:19 AM IST

ताज्या बातम्या