मुंबई, 29 जुलै: कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्ती (Fully Vaccinated People) लवकरच मुंबईच्या लोकल ट्रेनमधून (Mumbai Local Trains) प्रवास करू शकणार आहेत. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या लोकल प्रवासावरचे निर्बंध (Restrictions) उठवण्यासंदर्भात निर्णय येत्या दोन-तीन दिवसांत होऊ शकतो, असं कॅबिनेट मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी सांगितलं.
'एक मंत्री म्हणून मलाही असं वाटतं, की कोरोना प्रतिबंधक लशीचे (Anti Covid Vaccine) दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना मुंबईतल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी द्यायला हवी. आम्ही मुख्यमंत्र्यांनाही याबाबत सांगितलं आहे. कृती दलाने दिलेल्या अहवालाच्या अभ्यासानंतर मुंबई लोकल प्रवासासंदर्भातला निर्णय येत्या दोन-तीन दिवसांत घेतला जाईल,' असं अस्लम शेख यांनी बुधवारी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं.
लोकल ट्रेन पूर्ववत सुरू करणं, तसंच लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना बेस्टच्या बसेसमधून (BEST Buses) प्रवासाची परवानगी देणं आदी विषयांवर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झाली, असंही शेख यांनी सांगितलं.
Corruption Case: अनिल देशमुखांविरोधात CBI ची मोठी कारवाई
कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पहिल्यांदा मार्च 2020 मध्ये लोकल ट्रेन बंद करण्यात आल्या. त्यानंतर यंदा मुंबईतली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढीला लागल्यानंतर 15 एप्रिल 2021पासून लोकल ट्रेन पुन्हा बंद करण्यात आल्या होत्या. तत्पूर्वी जुलै महिन्यात प्रवासी संघटनांनी असा इशारा दिला होता, की लोकल ट्रेन बंद केल्यास आम्ही आंदोलन करू आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करणार नाही.
रेल्वे प्रवासी परिषद या प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितलं, 'लोकल ट्रेन बंद असल्यामुळे प्रवासात येत असलेल्या अडचणी घेऊन लोक आमच्याकडे येत आहेत. कामासाठी लोकांना प्रवास करणं अनिवार्य असून, त्यांना दिवसाला जवळपास सहा तासांचा बस प्रवास करावा लागत आहे. ही 'अनलॉक'ची कोणती प्रक्रिया आहे? यावर कोणतंच काम केल गेलं नाही, वेळेत निर्णय घेतला गेला नाही, तर रेल्वे ट्रॅक्स आणि रस्त्यांवर बसून आंदोलन करायला लोकांना वेळ लागणार नाही.'
राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात...
लसीकरण पूर्ण झालेल्या म्हणजेच लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना लोकल ट्रेनमधून प्रवासाची परवानगी दिली जावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी (Passenger Associations) राज्य सरकार, तसंच रेल्वेकडे केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्यापूर्वी सरकारने नागरिकांना लोकल ट्रेनमधून ठराविक वेळेत प्रवासाची परवानगी दिली होती. सकाळी नऊ ते 12 आणि सायंकाळी चार ते रात्री 9 या गर्दीच्या वेळा वगळता अन्य वेळांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना लोकल ट्रेनमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे मध्य रेल्वेच्या (CR) लोकलमधून दररोज 20 लाख, तर पश्चिम रेल्वेच्या (WR) लोकलमधून दररोज 13 लाख एवढे प्रवासी प्रवास करत होते. दुसरी लाट आल्यानंतर मात्र ही सेवा पुन्हा बंद करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lockdown, Mumbai local