Home /News /maharashtra /

अनिल देशमुखांविरोधात CBI चा तपास वेगानं, राज्यात 12 ठिकाणी छापेमारी; पोलीस अधिकाऱ्यांच्या गावात चौकशी

अनिल देशमुखांविरोधात CBI चा तपास वेगानं, राज्यात 12 ठिकाणी छापेमारी; पोलीस अधिकाऱ्यांच्या गावात चौकशी

Anil Deshmukh Corruption Case: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखां विरोधातल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (Central Beureu of Investigation ) सर्वांत मोठी छापेमारी ( Raids )मोहिम राबवली आहे.

    मुंबई, 29 जुलै: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखां (Anil Deshmukh) विरोधातल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (Central Beureu of Investigation ) सर्वांत मोठी छापेमारी ( Raids )मोहिम राबवली आहे. अनिल देशमुखांविरोधात असलेल्या वसुली आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सीबीआय (CBI) मार्फत करण्यात आली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी राज्यात 12 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं. त्यासोबतच यासह सीबीआयनंही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरासह काही जागांवर छापे टाकले. राज्यातील मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane), नाशिक, (Nashik), सांगली (Sangli)आणि अहमदनगर येथे सीबीआय अधिकाऱ्यांनी छापे टाकत सर्च ऑपरेशन राबवलं. आजतक/ इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयितांव्यतिरिक्त मुंबई आणि अहमदनगरमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील (Sanjay Patil) आणि पोलीस उपायुक्त राजू भुजबळ (Raj Bhujbal) यांच्या जागेंची झडती घेण्यात आली. राजू भुजबळ हे समाजसेवा शाखेचे प्रभारी होते आणि एसीपी संजय पाटील हे देखील त्याच शाखेशी संबंधित होते. भुजबळ आणि पाटील यांचीही ईडीने चौकशी केली होती. दरम्यान या प्रकरणातील संशयितांना सीबीआय अटक करु शकते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. यहाँ के हम सिकन्दर! पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू कायम ईडीचं सर्च ऑपरेशन बुधवारी 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडी (ED) च्या अधिकाऱ्यांनी अहमदनगर (Ahmednagar)मध्ये चौकशी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी राजू भुजबळ अधिकाऱ्याच्या गावात जाऊन त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा जबाब ईडीने नोंदवला आहे. मुंबई पोलिसांत उपायुक्त पदावर कार्यरत असलेले राजू भुजबळ यांचे मुळ गाव अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात आहे. बुधवारी या ठिकाणी ईडीचे पथक दाखल झाले आणि त्यांचा जबाब नोंदवला. या बाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती नसून दोन वाहनां मधून हे अधिकारी आले होते. या पोलीस अधिकाऱ्याच्या नातेवाईकांची चौकशी करून हे पथक माघारी परतले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Anil deshmukh, CBI

    पुढील बातम्या