मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लोकलसंबंधी येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील; राज्यातल्या निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राजेश टोपेंची माहिती

लोकलसंबंधी येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील; राज्यातल्या निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राजेश टोपेंची माहिती

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे, अ

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे, अ

Maharashtra Unlock Rajesh Tope Updates: राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर राज्याचे आरोग्यमंत्री (Health Minister) राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

मुंबई, 29 जुलै: महाराष्ट्र कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) नियंत्रणात आली आहे. अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या ही जळवपास आटोक्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनसह (Lockdown) इतर निर्बंध कोरोनाचे रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून (districts with lower corona cases) पूर्णतः हटवले जाण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा रुग्णदर 1 टक्क्यांपेक्षाही (1 percent) कमी आहे, अशा जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णतः संपण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर राज्याचे आरोग्यमंत्री (Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे. येत्या दोन दिवसात निर्बंध (Restrictions) शिथिल करण्यासह लोकल (Local Train)संबंधी निर्णय घेऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचं प्रमाण अजूनही जास्त आहे. त्यामुळे तेथील निर्बंध शिथील केले जाणार नाही. इतर जिल्ह्यांच्या हद्दीपर्यंत जे काही तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध आहेत ते शिथिल करण्यासंदर्भात आरोग्य विभागाच्या (Health Ministery) आणि मदत व पुनवर्सन विभागाच्या सूचना मिळून मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. (Relaxation of restrictions in the state)

तसंच राज्यातल्या इतर 25 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट खूप कमी आहे. ज्या जिल्ह्यात वाढीचा दर कमी आहे. त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करत असताना दुकानं 4 ऐवजी अतिरिक्त वेळ सुरु ठेवण्यास मुभा दिली जाऊ शकते, असंही ते म्हणालेत.

Corruption Case: अनिल देशमुखांविरोधात  CBI ची मोठी कारवाई

जगातल्या अनेक देशांमध्ये तिसरी लाट आली आहे. मात्र लसीकरण झाल्यानं त्याचा धोका काही प्रमाणात कमी आहे. जरी संक्रमण होत असलं तरी मृत्यूचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेतील संक्रमण गंभीर स्वरुपाचं नाही आहे. जास्त निर्बंध घालूनही चालणार नाहीत. म्हणूनच राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी

राज्यात तिसरी लाट येईल तेव्हा येईल. राज्याची तिसऱ्या लाटेसाठी तयारी आहे का हे खूप महत्त्वाचं आहे. पण येणाऱ्या लाटेसाठी आमची तयारी झाली आहे. या लाटेसंदर्भात जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात. सरकारनं लहान मुलांसाठी लागणाऱ्या औषधांचीही तयारी करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेसाठी सर्व बाजूंनी आपण तयार असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. तसंच लोकांनी कोरोना नियमांचं पालन करावं आणि लसीकरणाला प्रतिसाद द्यावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

पुण्यात गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मुलाची दहशत, तरुणाची हत्या

लोकलसंदर्भातही लवकरच निर्णय

सध्या सामान्य रेल्वे प्रवाशांना लोकल ट्रेननं प्रवास करण्याची मुभा नाही आहे. त्यामुळे यात लस घेतलेल्यांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी द्यायची का नाही यावर देखील येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय होईल, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Maharashtra News, Mumbai local, Rajesh tope