मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'सत्ता हाच फक्त नात्यांचा धागा नसतो', सेनेची पुन्हा एकदा स्पष्टोक्ती!

'सत्ता हाच फक्त नात्यांचा धागा नसतो', सेनेची पुन्हा एकदा स्पष्टोक्ती!

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांचा आदर नेहमीच राखला. मंगळवारीही विनम्रपणे त्यांनी राज्याचे प्रश्न पंतप्रधानांसमोर ठेवले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांचा आदर नेहमीच राखला. मंगळवारीही विनम्रपणे त्यांनी राज्याचे प्रश्न पंतप्रधानांसमोर ठेवले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांचा आदर नेहमीच राखला. मंगळवारीही विनम्रपणे त्यांनी राज्याचे प्रश्न पंतप्रधानांसमोर ठेवले.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 09 जून : 'सत्तेत एकत्र नसलो याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही,  राजकीय मतभेद होणे म्हणजे व्यक्तिगत नाते सैल पडले असे होत नाही. पुन्हा व्यक्तिगत नात्यागोत्यांत फक्त सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो. ही नाती शिवसेनेने नेहमीच सांभाळली आहेत. नरेंद्र मोदी (PM Narednra Modi)–उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) भेट जशी राजशिष्टाचाराचा भाग होती तशीच व्यक्तिगत नात्याचीही होती. ज्यांना या भेटीत राजकारण दिसते ते धन्य होत.' असं म्हणत शिवसेनेनं (Shivsena) आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांना टोला लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) , अजित पवार (Ajit Pawar)आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नवी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यात मोदी आणि ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले, यावर प्रकाश टाकत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भूमिका स्पष्ट करण्यात आली.

आज मुंबई- गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी 'ही' महत्त्वाची बातमी

‘मराठा आरक्षणा’चा वेगळा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यापासून महाराष्ट्रातील जातीय राजकारणास बहार आली आहे. मराठा संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे रणशिंग फुंकले आहे. विनायक मेटे वगैरे नेत्यांनी मोर्चे काढण्यास सुरुवात केली. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनीही ‘आता माघार नाही’ असा बाणा दाखवत मराठा समाजासाठी लढण्या-मरण्याची भाषा केली. संभाजीराजे यांनी आंदोलन केले तर त्या आंदोलनात आपण सहभागी होणारच, असे भाजपच्या काही नेत्यांनी जाहीर केले. त्यामुळे याप्रकरणी राजकारण तापले आहे. हे खरे असले तरी आरक्षणाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रालाच आहे. त्यामुळे पुढची लढाई दिल्लीत करावी लागेल हे माहीत असतानाही मराठा आरक्षणाबाबत काही पुढारी मुंबईत बसून लोकांची डोकी भडकवीत आहेत. हे सर्व उद्योग महाराष्ट्रात सुरू असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट दिल्लीच गाठली व मोदींनाच सांगितले, ‘मराठा आरक्षणाचा तिढा सोडवा!’ मात्र त्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांची गोची झाली आहे' असं म्हणत सेनेनं भाजपवर निशाणा साधला.

'महाराष्ट्र हिताच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे कुणाचीही व कसलीही भीडभाड ठेवणारे नेते नाहीत. महाराष्ट्राच्या वाट्याचे व हक्काचे जे काही आहे ते मिळायलाच हवे, असे ठोकून सांगणाऱ्यांपैकी सध्याचे मुख्यमंत्री आहेत. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलीच असेल. महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले हे यासाठी महत्त्वाचे की, इतर ठिकाणी जो राज्य-केंद्र संघर्ष सतत सुरू आहे त्याची लागण महाराष्ट्राला लागलेली नाही' असंही सेनेनं म्हटलं.

अल्झायमरच्या रुग्णांना दिलासा;पहिल्यांदाच मिळालं औषध; Aduhelm ला एफडीएची मंजूरी

'महाराष्ट्राचे ना दिल्लीशी भांडण ना केंद्राशी संघर्ष. राज्यातील महाविकास आघाडी सरकारची बांधिलकी विकास व जनसेवेशी आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांचा आदर नेहमीच राखला. मंगळवारीही विनम्रपणे त्यांनी राज्याचे प्रश्न पंतप्रधानांसमोर ठेवले. पंतप्रधानांनीदेखील सर्व मुद्दे शांतपणाने ऐकून घेतले. ते आता हळूहळू मार्गी लागतील ही आशा बाळगायला हरकत नाही', असा विश्वास सेनेनं व्यक्त केलं.

'सत्तेत एकत्र नसलो याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सांगितले. हे नाते काय व कसे याचा सखोल अभ्यास यापुढे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी करीत राहावा. राजकीय मतभेद होणे म्हणजे व्यक्तिगत नाते सैल पडले असे होत नाही. पुन्हा व्यक्तिगत नात्यागोत्यांत फक्त सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो. पंतप्रधान-मुख्यमंत्री भेटीने महाराष्ट्राचे केंद्रातील प्रश्न मार्गी लागोत, अशी अपेक्षाही सेनेनं व्यक्त केली.

First published:

Tags: Ajit pawar, BJP, Samana, Shivsena, सामना