जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाबाबत मोठी अपडेट, वाचा सविस्तर

मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाबाबत मोठी अपडेट, वाचा सविस्तर

मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाबाबत मोठी अपडेट, वाचा सविस्तर

Traffic Updates: आज मुंबई गोवा महामार्गा (Mumbai-Goa Highway) वरुन प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 जून: आज मुंबई गोवा महामार्गा (Mumbai-Goa Highway) वरुन प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी ( Vashishti Bridge) पुलावरची वाहतूक आज रात्रभर बंद राहणार आहे. सध्या पुलावर दुरुस्तीचं काम सुरु या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन पुलावर स्लॅब टाकण्यासाठी जुन्या पुलावरील वाहतूक रात्रभर बंद ठेवणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान उद्या सकाळी पुन्हा वाहतूक सुरु होईल, अशीही माहिती देण्यात आली आहे. वाहतूक बंद केल्यानं या काळात चिपळूणमधील परशुराम घाटातील बायपास मार्गे वाहतूक वळवण्यात येईल. पावसाळा सुरु होण्याआधी नव्या पुलावरील वाहतूक सुरू करण्यासाठी वाशिष्ठी पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: goa , mumbai , traffic
  • First Published :
जाहिरात
जाहिरात