Home /News /mumbai /

विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर तुम्ही किती दिवस बसाल याबद्दल शंका; शिवसेनेचे सुनील प्रभू असं का म्हणाले?

विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर तुम्ही किती दिवस बसाल याबद्दल शंका; शिवसेनेचे सुनील प्रभू असं का म्हणाले?

आमचा व्हीप झुगारून 39 सदस्यांनी मतदान केलं आहे. त्यामुळे किती दिवस तुम्ही या खूर्चीवर बसाल सांगता येत नाही, असंही सुनील प्रभू यांनी म्हटलं.

    मुंबई, 3 जुलै : शिंदे-फडणवीस नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) 164 मतांनी विजयी झाले. राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना शिवसेनेच्या सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी म्हटलं की, तरुण अध्यक्ष म्हणून गौरव आहे. आधी तुम्ही शिवसेनेत होतात, त्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीत गेलात. नंतर भाजपात गेलात. कायद्याचा तुमचा अभ्यास पाहता तुम्ही कायदामंत्री व्हाल, असं वाटलं होतं. पण दुर्दैव आहे. नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात. ज्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहत होतं, त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. कायदामंत्री म्हणून पाहत होतो, त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पाहतोय. देवेंद्रजी (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यामुळे आमचं दुःख विसरून आम्हाला मित्र म्हणून देवेंद्रजी यांचं वाईट वाटतंय, असा टोलाही सुनील प्रभू यांनी लागवला. Assembly Speaker Election : शिंदे सरकारने मारली बाजी, अध्यक्षपदासाठी मिळवली 164 मतं विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर तु्म्ही बसलात, सगळ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही याचा वापर कराल, असा विश्वास व्यक्त करतो. मात्र आमचा व्हीप झुगारून 39 सदस्यांनी मतदान केलं आहे. त्यामुळे किती दिवस तुम्ही या खूर्चीवर बसाल सांगता येत नाही, असंही सुनील प्रभू यांनी म्हटलं. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिरगणतीमध्ये  बहुमताचा आकडा पार केला आहे. राहुल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं पडली आहे. तर नार्वेकर यांच्याविरोधात 107 मत पडली आहे. 3 आमदार हे तटस्थ होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सात आमदार आज सभागृहात नव्हते. Assembly Speaker Election : शिंदे सरकार जिंकले, राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड कोण आहेत नार्वेकर ? 11 फेब्रुवारी 1977 रोजी जन्मलेले नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष आहेत. त्यांना वयाच्या 45 व्या वर्षीच अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. नार्वेकर हे कायद्याचे पदवीधर (LLB) असून अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांचा त्यांचा जवळचा संबंध आहे. या संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड झालेल्या नार्वेकरांचा भाजपा हा तिसरा पक्ष आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेकडून झाली. शिवसेनेमध्ये ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे समजले जात. शिवसेनेतील आधुनिक आणि इंग्रजी बोलणारा, मीडियाचा जवळचा चेहरा अशी त्यांची ओळख होती. त्यानंतर नार्वेकरांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. यापूर्वी विधान परिषदेचे आमदार असलेले नार्वेकर 2019 मध्ये पहिल्यांदाच कुलाबा मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या