Home /News /mumbai /

Assembly Speaker Election : शिंदे सरकार जिंकले, राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड

Assembly Speaker Election : शिंदे सरकार जिंकले, राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड

हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.

    मुंबई, 03 जुलै : एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election )  आज पार पडली.  शिरगणती करण्यात आली असून भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड आता निश्चित मानली जात आहे. शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर नार्वेकर यांच्याविरोधात 107 मत पडली आहे. तर राहूल नार्वेकर  यांच्या बाजूने 164 मतं पडली आहे. तर 3 आमदार हे सदस्य तटस्थ होते. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. सुरुवातील शिरगणती करण्यात आली . शिंदे आणि भाजपच्या बाजूने बसलेल्या आमदारांची संख्या ही बहुमताचा आकडा पार केला. राहुल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं मिळाली त्यामुळे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर मविआचे उमेदवार राजन साळवी यांच्याविरोधात 107 मतं मिळाली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे. (VIDEO : ...आणि कार्यकर्त्याच्या लग्नात दानवे बनले मामा, हाती घेतला अंतरपाट) यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत.  आधी ते शिवसेनेत होते,आता भाजप मध्ये आहेत, त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही होते. त्यामुळे या सर्व पक्षांना अभिप्रेत असलेल्या भूमिकांची त्यांना उत्तम जाण आहे. पक्षाची हीच भूमिका प्रवक्ते म्हणून मांडताना त्यांनी वेळोवेळी आपल्यातील हे गुण दाखवून दिलेले आहेत. त्यामुळे कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या विधिमंडळाला अनेक उत्तम अध्यक्षांची मोठी परंपरा आहे. कै. ग. वा. माळवणकर यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, अरुण गुजराती, दिलीप वळसे पाटील, हरिभाऊ बागडे आणि  नाना पटोले यांच्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे या विधिमंडळात कायमच अध्यक्षांना एक वेगळं महत्व आणि मान राहिलेला आहे. तीच धुरा आपल्या खांद्यावर पुढे घेऊन चालण्याची जबाबदारी आता राहुल नार्वेकर यांच्या खांद्यावर आलेली असून ते ती नक्कीच पूर्ण क्षमतेने निभावून नेतील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. आज अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर उद्या बहुमत चाचणीला देखील सरकारला सामोरे जायचे आहे त्यात देखील हे सरकार निश्चितच यशस्वी होईल असा विश्वास शिंदे यांनी  व्यक्त केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या