काळा पैसा आणण्याची मोदींना कोरोना संकटात संधी, शिवसेनेचा 'आत्मनिर्भर' टोला

काळा पैसा आणण्याची मोदींना कोरोना संकटात संधी, शिवसेनेचा 'आत्मनिर्भर' टोला

या 20 लाख कोटीतून हिंदुस्थान स्वावलंबी बनेल. म्हणजे तो आता स्वावलंबी नाही काय?

  • Share this:

 मुंबई, 12 मे : कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही आत्मनिर्भर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. परंतु, दुसरीकडे  उद्योगपती पळून जाणे हे आता नव्या आत्मनिर्भरतेकडे जाणार्‍या हिंदुस्थानला परवडणारे नाही. काळा पैसा आणावा व गरिबांना वाटावा अशी एक स्वप्न योजना मोदी यांनी मांडली होती त्यावर काम करण्याची संधी कोरोना संकटाने दिली, असा सल्लावजा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखातून आत्मनिर्भर आर्थिक पॅकेजवरून भाजपला खडेबोल सुनावण्यात आले आहे. 'लॉक डाऊन – 4 चे सुतोवाच करताना पंतप्रधानांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करूनही शेअर बाजाराच्या बैलाने साधे शेपूटही का हलवले नाही? असा टोला लगावत, 'भांडवलदार, गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत असून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी विश्वास आणि अभय दिलेच पाहिजे' असा सल्ला सेनेनं दिला आहे.

आता स्वावलंबी नाही काय?

तसंच,  'पंतप्रधानांचे 20 लाख ‘कोटीं’चे पॅकेज याच लघू, मध्यम आणि छोटे उद्योजक तसेच व्यावसायिकांना आधार देण्यासाठी आहे. गरीब, मजूर, शेतकरी, नियमित कर देणार्‍या मध्यमवर्गीयांनाही या पॅकेजचा लाभ मिळेल, असे भासवण्यात आले आहे.

हेही वाचा -कोरोना लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातून अंगावर शहारा आणणारी माहिती समोर

एकंदरीत 20 लाख कोटी हे देशातील 130 कोटी लोकसंख्येत वाटले जातील व त्यातील गरीब, मध्यमवर्गीयांना या पॅकेजचा लाभ मिळेल, असे पसरवले गेले आहे. या 20 लाख कोटीतून हिंदुस्थान स्वावलंबी बनेल. म्हणजे तो आता स्वावलंबी नाही काय?' असा सवालही सेनेकडून उपस्थितीत करण्यात आला आहे.

'...तेव्हा पंडित नेहरू होते'

'आज पीपीई किटस् बनविणार्‍या आयसीएमआरसारख्या विज्ञान संस्था याच आत्मनिर्भर हिंदुस्थानच्या भाग आहेत. तेव्हा पंडित नेहरू होते, आज मोदी आहेत. राजीव गांधी यांनी डिजिटल इंडियाचा पायाच घातला नसता तर आज कोरोना संकटातील ‘अस्पृश्य’ काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान, मुख्यमंत्री, अधिकारीवर्गाचा संवाद होऊ शकला नसता' असा टोलाही लगावण्यात आला.

20 लाख कोटींचे स्वप्न हे त्या मजुरांना काय देईल?

'देशभरातील प्रमुख शहरांतून लाखो मजूर पायी आपल्या राज्यांत निघाले आहेत. हे राज्यव्यवस्थेचे सगळ्यात मोठे अपयश आहे. मोदींनी या मजुरांबाबत संवेदना व्यक्त केल्या व आर्थिक पॅकेजमधून या मजुरांवर लक्ष केंद्रित केले जाईल असे सांगितले. (म्हणजे नक्की काय होईल?) मजुरांच्या स्थलांतरामुळे अनेक राज्यांचे सामाजिक व औद्योगिक विघटन झाले आहे.

हेही वाचा -पुणेकरांसाठी आतापर्यंतची सर्वात चांगली बातमी, नव्या आकडेवारीने बदलले चित्र!

मजुरवर्ग नसेल तर पायाभूत प्रकल्पांची उभारणी कशी होणार? अमेरिकेसारख्या राष्ट्रांतून जे लोक नोकर्‍या गमावून येथे आले आहेत आणि ‘वंदे भारत मिशन’च्या सरकारी योजनेतून जे येथे अवतरले आहेत ते काही अशी अंगमेहनतीची कामे करणार नाहीत. त्यामुळे 20 लाख कोटींचे स्वप्न हे त्या मजुरांना काय देईल?' असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला.

'काळा पैसा आणण्याची मोदींना संधी'

'कोरोनाआधीच आपली अर्थव्यवस्था खचली होती. एअर इंडिया, भारत संचार निगमसारखे मोठे सरकारी प्रकल्प मरायला टेकले होते. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी चारेक हजार कोटींचे आर्थिक पॅकेज द्यायचीही सरकारची ऐपत नव्हती. जेट विमान कंपनीस तातडीने पाचशे कोटींचा आधार दिला असता तर तो उद्योग व तेथील लोकांच्या नोकर्‍या वाचल्या असत्या. या पार्श्वभूमीवर 20 लाख कोटी सरकार कोठून जमा करणार?   देशाबाहेर काळा पैसा आहे, तो आणावा व गरिबांना वाटावा अशी एक स्वप्न योजना मोदी यांनी मांडली होती त्यावर काम करण्याची संधी कोरोना संकटाने दिली आहे' अशी आठवणही सेनेनं मोदींना करून दिली.

संपादन - सचिन साळवे

First published: May 14, 2020, 10:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading