पुणे, 14 मे : देशभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यात मुंबई आणि पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. एकीकडे कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याचं प्रमाण वाढल्याची दिलासादायक बाबसमोर आली आहे. पुणे शहरात काल बुधवारी 12 मे रोजीपर्यंत 1 हजार 377 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे. पुण्यात कोरोना अॅक्टिव्ह केसेसपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्यास समोर आलं आहे. पुणे शहराच्या महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही याबद्दल आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. हेही वाचा - लवकरच सुरू होणार शताब्दीसह इतर मेल एक्सप्रेस, स्पेशल ट्रेनमध्ये मिळणार ही सुविधा पुणे शहरात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही 2 हजार 824 इतकी आहे. आतापर्यंत 1 हजार 377 लोकांना कोरोनावर मात केली आहे. तर 1 हजार 284 रुग्णांवर उपचार सुरू आहे. पुणे शहरात काल दिवसभरात आणखी 168 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असल्याची बाबसमोर आली. तर 87 नवे रूग्ण आढळून आले आहे. तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात 12 मे रोजीपर्यंत दिवसभरात 98 जणांना कोरोनाची लागण झाली तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3232 पोहोचली आहे. तर 180 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात दिवसभरात 168 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. हेही वाचा - छोट्या करदात्यांना मोठा दिलासा; करकपात कमी, इनकम टॅक्स भरण्याची मुदतही वाढली एकंदरीतच पुण्यात आता कोरोनाची लागण झालेल्या रुग्ण संख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे त्यात पुणे शहरातून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.