मुंबई, 02 डिसेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मागच्या चार दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मागच्यादोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार असल्याचे सूचक विधान केले. यानतंर मागच्या कोकण दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करत असताना मनसेने मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर घोटाळा बाहेर काढत ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्यावर टीका केली आहे.
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी आदेश बांदेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सिद्धीविनायक ट्रस्टच्या नावाखाली बांदेकर यांनी पैसे खाल्याचे किल्लेदार यांचे म्हणणे आहे, यावेळी किल्लेदार म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार असताना ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. दरम्यान यावेळी या शिवभोजन थाळीचे काम सिद्धिविनायक न्यास मंदीराला आले होते.
हे ही वाचा : सीमावादाचं लोण मराठवाड्यातही पोहोचलं; 'या'मुळे नांदेडमधील 25 गावं तेलंगणात सामील होणार?
मंदीर प्रशासन ही थाळी देऊ शकले असते पण बांदेकरांनी याला फक्त अर्थसहाय्य देतो असे पत्र दिले. बांदेकरांनी फक्त उद्धव ठाकरे यांच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी आणि कॅबिनेट दर्जा मिळण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप किल्लेदार यांनी केला.
किल्लेदार पुढे म्हणाले की, बांदेकरांनी याच्यासाठी वेळ न घालवता 19 जानेवारीला ठराव केला आणि 28 जानेवारीला वेगळे अकाउंट काढले. दरम्यान हा कोरोनाचा काळ होता या काळात त्यांनी हा प्रकार केल्याचे किल्लेदार म्हणाले. कार्यकारी अधिकारी आणि बांदेकर यांनी परस्पर निर्णय घेतला यावर कार्यकारी अधिकारी यांचा रिमार्क आहे.
यामध्ये बांदेकरांनी सिद्धीविनायक मंदीर ट्रस्टचा पाच कोटी फंड पाठवला नंतर यांनी पत्र लिहले की तरतुदी करून घेण्यास सांगितलं कारण 25 हजार पेक्षा पैसे पाठवतां येत नाही त्यासाठी सरकारचा ठराव लागतो. दरम्यान या निर्णया विरोधात काही विश्वस्तानी कोर्टात शपथपत्र दिले आहे. की या गोष्टीशी आमचा संबंध नाही यामुळे बांदेकरांनी मंदीर प्रशासनातील कोणालाही विश्वासात न घेता हा प्रकार केल्याचे किल्लेदार म्हणाले.
हे ही वाचा : 'राज ठाकरे आधी असे नव्हते', शरद पवारांवरील टिकेनंतर रुपाली ठोंबरेंनी सुनावलं
नियमाप्रमाणे बैठक झाली पाहीजे पण तसं काही झालं नाही. परस्पर आदेश बांदेकर यांनी चेकवर सह्या करून हे पैसे पाठवले. दरम्यान याबात कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हा सगळा खटाटोप फक्त वाढीव कालावधीसाठी बांदेकर यांनी केला असल्याचे किल्लेदार म्हणाले. मंदीरे लुटता आणि हिंदुत्व बोलता हे तुमचे हिंदुत्व का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.
दरम्यान आम्ही हा सगळ्या गोष्टीची तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले, जी चौकशी सुरु आहे ती गंभीररित्या करावी अशी मागणी करणार आहोत आदेश बांदेकरांनी आता पारदर्शकता सिद्ध करावी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र देतोय 15 दिवसात जर कारवाई झाली नाही तर आम्ही जोरदार आंदोलन करण्याचा इशारा किल्लेदार यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray (Politician), Shiv Sena (Political Party), Siddhivinayak Mandir, Uddhav Thackeray (Politician)